सभासद , वाहतूकदार अन् कर्मचाऱ्यांनी केला शिमगा
भगीरथ भालके ..२१५ कोटींचं काय केलं सांगा ?
अमरजीत पाटील यांचा भगीरथ भालके यांना सवाल
पंढरपूर (प्रतिनिधी)
गेल्या तीन-चार वर्षात महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेने, विठ्ठल कारखान्यास २१६ कोटींचे कर्ज दिले. सभासद, ऊस वाहतूकदार आणि कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी पैशासाठी शिमगा केला. तरीही चेअरमनला घाम नाही आला. भगीरथ भालके त्या २१५ कोटींचं काय केलं सांगा ? असा सवाल अमरजीत पाटील यांनी भगीरथ भालके यांना फुलचिंचोली येथील प्रचार सभेत केला. यावेळी युवराज पाटील, ॲड. दीपक पवार, गणेश पाटील यांच्यासह फुलचिंचोली येथील सभासद वर्ग उपस्थित होता.
विठ्ठलची निवडणूक रंगत चालली आहे. युवराज पाटील गटासह, सर्वच गटाच्या प्रचारसभा गावोगांव होत आहेत. या सभांमधून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. युवराज पाटील गटाची प्रचारसभा शनिवारी सायंकाळी फुलचिंचोली येथे पार पडली. यावेळी अमरजीत पाटील यांनी विठ्ठलचे चेअरमन भगीरथ भालके यांच्या कारभाराची पोलखोल केली.
असा सवाल त्यांनी भगीरथ भालके यांना केला.
सन २०१९-२० सालापासूनच विठ्ठल कारखान्यास घरघर लागली. ज्या काळात विठ्ठल कारखाना संकटात सापडला, त्या काळात महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेने विठ्ठल कारखान्यास कर्ज दिले असल्याची माहिती, अमरजीत पाटील यांनी या प्रचार सभेत दिली.
३१ मे २०१९ ते १५ ऑक्टोबर २०२० या १८ महिन्यांच्या काळात विठ्ठल कारखान्यास सुमारे १५ कोटी ५२ लाख रुपयांचे कर्ज मिळाले असल्याची माहिती, अमरजीत पाटील यांनी तारखेनुसार दिली. इतका पैसा कारखान्याकडे येऊनही २०२०-२१ च्या गळीत हंगामातील सभासदांची ऊसबिले कारखान्याकडे थकली. ऊस वाहतूकदार अन् कर्मचाऱ्यांचे पगारही थकले. या लोकांनी कारखान्याच्या दारात बोंबही ठोकली. तरीही कारखाना प्रशासनास पाझर फुटला नाही. सर्वांची देणी थकीत ठेवून या २१५ कोटींचे केले तरी काय ? याचा हिशोब भगीरथ भालके यांनी अगोदर द्यावा, असा सवाल अमरजित पाटील यांनी केला.
युवराज पाटील यांच्या नांवे खडे फोडणारे भगीरथ भालके लबाड बोलत आहेत. थोतांड कारभार लपवण्यासाठी कै. आ. भारत भालके यांच्या निधनाचा आधार घेत आहेत. अशी तोफ अमरजीत पाटील यांनी यावेळी डागली.
विठ्ठल कारखान्यास महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडून पाच टप्प्यात २१५ कोटी ५२ लाख रुपये मिळाले. त्याची तारीख वार माहिती अमरजीत पाटील यांनी दिली आहे.
३१ जून २०१९ - २५.५२ कोटी
९ जुलै २०१९ - ५० कोटी
३१ डिसेंबर २०१९ - ३० कोटी
२६ जून २०२० - ५० कोटी
१५ ऑक्टोबर २०२० - ६० कोटी
0 Comments