आण्णाभाऊ पॅनलच्या प्रचारासाठी कार्यकर्त्यांची फौज !



 आण्णाभाऊ पॅनलच्या प्रचारासाठी कार्यकर्त्यांची फौज !

भोसे येथे कार्यकर्त्यांचा मेळावा

पंढरपूर तालुक्यातील भोसे हे राजकीयदृष्ट्या संवेदनशील गांव आहे. या गावात कार्यकर्त्यांचे मोहोळ आहे. गणेश पाटील आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी असलेला हा कार्यकर्त्यांचा समुदाय, बुधवारी गणेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकवटला. कारखान्याच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी कशी करायची ? याचे विश्लेषण गणेश पाटील यांच्याकडून करण्यात आले. आता हे कार्यकर्त्यांचे मोहोळ तालुकाभर पसरणार आहे. कार्यकर्त्यांची ही फौज युवराज पाटील यांच्या पॅनलचा तालुकाभर प्रचार करणार आहे.



विठ्ठल कारखान्याची निवडणूक सध्या अंतिम टप्प्यात आहे. मंगळवारी चिन्हांचे वाटप झाल्यानंतर प्रचारास वेग आला आहे. निवडणूक आयोगाचे बंधन पाळत वेगाने प्रचारयंत्रणा राबवावी लागणार आहे. येत्या ५ जुलै रोजी मतदान पार पडणार आहे. यादृष्टीने थोडक्या दिवसात झंजावती प्रचार करण्याची यंत्रणा कशी राबवायची ? याबाबत भोसे येथील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यास , गणेश पाटील यांनी मार्गदर्शन केले. आता हे सर्व कार्यकर्ते तालुकाभर पसरणार आहेत. कै. राजुबापू पाटील यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेली ही कार्यकर्त्यांची फौज तालुक्यातील प्रत्येक भागात दिसणार आहे. तालुक्यातील प्रत्येक सभासदाच्या घरी पोहोचून निवडणूक चिन्ह आणि मतदान करण्याविषयी सभासदांची जागृती करणार आहेत.

चौकट

मंगळवारी सकाळी भोसे येथे गणेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, कार्यकर्त्यांच्या प्रचार मेळावा पार पडला. या निवडणुकीच्या प्रचारासाठी यावेळी रणनीती आखण्यात आली. कार्यकर्त्यांचे गट पाडून त्यांना वेगवेगळी ठिकाणेही देण्यात आली आहेत. गुरुवारपासून भोसे येथील हे कार्यकर्त्यांचे मोहोळ तालुक्यातील प्रत्येक गावात पोहोचणार आहे.

Post a Comment

0 Comments