श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना हा सभासदांच्याच मालकीचा राहणार...
- भगिरथ भालके
पंढरपूर (दि.30) ः श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणुकीनिमित्त श्री विठ्ठल शेतकरी विकास पॅनलच्या प्रचारा दरम्यान चेअरमन श्री भगिरथ भालके हे आंबे व देगांव येथील प्रचार सभेत बोलत होते.
यावेळी बोलतांना चेअरमन श्री भगिरथ भालके म्हणाले की, श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना हा सभासदांच्या मालकीचाच राहणार असून विरोधक अपप्रचार करीत असल्याचे सांगितले. प्रचार सभेच्या अध्यक्षस्थानी देगांवचे मा.सरपंच श्री शांतीनाथ रणदिवे हे होते.
यावेळी बोलतांना चेअरमन श्री भगिरथ भालके म्हणाले की, आमदार स्व.भारतनाना भालके यांनी श्री विठ्ठल कारखान्याचे चेअरमन झाल्यानंतर दुष्काळी परिस्थितीमध्ये सभासदांना जमीन,पााणी तुमचे अन् खत,बेणे आमचे ही योजना राबविली होती त्यामुळे शेतकर्यांना खूप मोठी आर्थिक मदत झाली. या योजनेमुळे जो शेतकरी ऊसाचे पिक घेत नव्हता तो शेतकरी आता ऊसाचे पिक घेऊ लागल्याने कारखाना क्षेत्रामध्ये ऊसाचे क्षेत्र वाढल्यामुळे कारखान्यास त्याचा फायदा होत आहे. याची जाणीव सर्व शेतकरी सभासद बंधू ठेवतील व आपल्या श्री विठ्ठल शेतकरी विकास पॅनलच्या कपबशी या चिन्हाला मतदान करून संपूर्ण पॅनल बहुमताने विजयी करावे असे आवाहन त्यांनी केले.
गेल्या 6 महिन्यापासून मी जरी सभासदांच्या संपर्कात नसलो तरी पुणे व मुंबई, मंत्रालय, एमएससी बँक येथे दररोज हेलपाटे घालत होतो आणि विरोधक मात्र अडचणी कशा निर्माण करता येईल ते पहात होते. मी आपणांस भेटू शकलो नाही म्हणून आपली जाहिर माफी मागून पुढील काळात अशी चूक होणार नाही याची काळजी घेतो.
लाल केसांचा विरोधक पॅनल प्रमुख व वाळूमाफीया यांचा रक्तरंजीत इतिहास सर्व जनतेला माहिती आहे. पुढील गळीत हंगामासाठी लागणर्या पैशांची तरतूद केली असून सभासदांची बिले दि.4 जुलै, 2022 रोजी साखर विक्री करून सभासदांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार असून या सभासदांच्या पैशाला मी भगिरथ भालके जबाबदार असल्याचे चेअरमन श्री भगिरथ भालके म्हणाले.
यावेळी मनसे नेते श्री दिलीप धोत्रे यांचेसह दोन्ही कारखान्याचे आजी माजी संचालक सर्वश्री लक्ष्मण पवार, मोहन कोळेकर, दिनकर पाटील, राजाराम बाबर, नेताजी सावंत, धनाजी घाडगे, आण्णा शिंदे, मारूती भोसले, अशोक शिंदे, शांतीनाथ रणदिवे, संतोष घाडगे, आर.डी पवार, सुधाकर कवडे, भिवाजी दांडगे, दादा ढोले, हणमंत दांडगे, दिलीप कोळी, तानाजी शिंदे, सुशिल सावंत, अरूण शिंदे, विशल शिंदे, अनिल गायकवाड, बाळु माने, कैलास शिंदे, नागनाथ गायकवाड यांचेसह विठ्ठल परिवाराचे मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते व सभासद बांधव उपस्थित होते.
0 Comments