पंढरपूर:
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा यंदाचा "उत्कृष्ट महाविद्यालय" पुरस्कार कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयाला जाहिर झाला असल्याची माहिती कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयाल शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी यशस्वीरित्या पूर्ण करीत आहे. ज्ञान दान पवित्र दान असं ब-याच वेळा म्हटलं जातं पण हे प्रत्यक्ष उतरविण्याचं काम पंढरपूर सिंहगड महाविद्यालय करत आहे. देशाला आवश्यक असणारे परफेक्ट इंजिनिअर सोबतच सुसंस्कृत नागरीक घडविण्याची महत्वकांक्षा आपल्या खांद्यावर घेऊन सिंहगड इंजिनिअरींग महाविद्यालय गगनभरारी घेत आहे. अल्पावधीतच यशाच्या शिखरावर गुणवत्ता सिद्ध करून पोचलेले पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज आहे. शिक्षण क्षेत्रात एक वेगळा ठसा निर्माण करून पंढरपूर सिंहगड महाविद्यालयाने शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
समाजाला आणि देशाला उपयुक्त असणार परफेक्ट इंजिनिअर देण्याचं काम पंढरपूर सिंहगड करीत आहे. इतक्या मोठ्या प्रदिर्घ प्रवासात अनेक अडचणी आल्या. पण निर्मळ मनाने हाती घेतलेले काम पुर्ण करण्यासाठी प्रत्यक्ष परमेश्वर सुद्धा हातभार लावतो आणि असंख्य संकटांवर मात करीत सिंहगड संस्था काळाच्या येणा-या क्षणाक्षणावर व लोकांच्या मनावर राज्य करीत राहिल. संस्थेच्या वाटेला आलेला संघर्ष इतका मोठा आहे की, जेव्हा जेव्हा शिक्षण क्षेत्रात गुणवत्तेची चर्चा होईल तेव्हा तेव्हा पंढरपूर सिंहगड संस्थेचे नाव अभिमानाने घेतले जाईल अशी खात्री आहे. अशा या पंढरपूर सिंहगड महाविद्यालयाला यंदाचा "उत्कृष्ट महाविद्यालय" चालू वर्षीचा पुरस्कार जाहिर झाल्याने पंढरपूर सिंहगड महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांमध्ये आनंदी वातावरण निर्माण झाले आहे.
हा पुरस्कार सोमवार, दि. १ ऑगस्ट २०२२ रोजी विद्यापीठाचा १८ वा वर्धापन दिन समारंभ साजरा होणार आहे. सकाळी नऊ वाजता ध्वजारोहणाचा कार्यक्रम कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर सकाळी अकरा वाजता विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे.
0 Comments