छत्तीसगडच्या जशपूरमधील एका प्राथमिक शाळेत ही शिक्षिका कार्यरत होती. ही शिक्षिका दारुच्या नशेत तर्राट होऊन धडपडत वर्गात पोहोचली. वर्गात पोहोचल्यावर ती खुर्चीवर बसली. मात्र, अती मद्य प्राशन केल्याने शिक्षिकेची शुद्ध हरपली आणि बेशुद्धावस्थेत खाली पडली. विद्यार्थ्यांनी या शिक्षीकेला उचलून खुर्चीत बसवले.
धडपत वर्गात आणि बेशुद्ध झाली
दरम्यान याचवेळी शिक्षण अधिकारी शाळेची पाहणी करण्यासाठी शाळेत दाखल झाले. मात्र तर्टाट शिक्षिकेला पाहून शिक्षण अधिकाऱ्यांना धक्काच बसला. बीईओ एमडेडयू सिद्दकी यांच पथक शाळेत तपासणीसाठी आले होते. अधिकारी वर्गात पोहोचले त्यावेळी एक महिला शिक्षिका खुर्चीत झोपलेल्या अवस्थेत दिसली. अधिकाऱ्यांनी शिक्षीकेला उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र शिक्षीकेने काहीच प्रतिसाद दिला नाही. त्यावेळी मुलांनी बाई धडपडत वर्गात आल्या आणि बेशुद्ध होऊन पडल्याचे अधिकाऱ्यांना सांगितले. मुलांनीच शिक्षिकेला उठवून खुर्चीत बसवल्याचेही विद्यार्थ्यांनी सांगीतले.
मेडिकल टेस्टमध्ये शरीरात अल्कोहोल सापडले
शिक्षिकेला बेशुद्ध अवस्थेत पाहिल्यानंर शिक्षण अधिकाऱ्यांनी तात्काल अतिरिक्त पोलीस अधिक्षक प्रतिभा पाण्डे यांना फोन केला. यानंतर शिक्षिकेची वैद्यकीय चाचणी करण्यासाठी महिला पोलीसाची मागणी केली. यावर एएसपी प्रतिभा पाण्डेने दोन महिला कॉन्स्टेबलला शाळेत पाठवल्या. त्यानंतर शिक्षिकेला पोलिसांच्या वाहनातून रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी शिक्षिकेची तपासणी केली. यावेळी तिच्या शरीरात अल्कोहोल असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे आता शिक्षिकेविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांनी केली शिक्षिकेची तक्रार
विद्यार्थी या बेवड्या शिक्षिकेला वैतागले होते. यावेळी या बेवड्या शिक्षिकेची तक्रार विद्यार्थ्यांनी शिक्षण अधिकाऱ्यांकडे केली. दररोज ही शिक्षिका इथे तिथे दारुसाठी फिरत असते. ती नेहमीच दारु पिऊन वर्गात येत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. शाळा समितीने तिला अनेकदा सुधारण्याची संधी दिली होती. मात्र त्यांच्यात काहीत सुधारणा झाली नाही आता तरी या शिक्षकेवर कारवाई होणार का? असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे. जगपती भगत असे या शिक्षिकेचे नाव आहे
0 Comments