जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक सोडतीबाबत 2 ऑगस्टपर्यंत हरकती नोंदवा

सोलापूर, दि. 29 (जिमाका): राज्य निवडणूक आयोगाच्या दि.22 जुलै 2022 रोजीच्या आदेशानुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक- 2022 साठी 28 जुलै 2022 रोजी निवडणूक विभाग आरक्षण व निर्वाचक गणाची सोडत प्रक्रिया पार पडलेली आहे.

प्रारूप आरक्षण परिशिष्ट- 24 मध्ये जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हापरिषद यांच्या नोटीस बोर्ड व संकेतस्थळ तसेच सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय व पंचायत समिती कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रसिध्द करण्यात आले आहे. जिल्हा परिषद निवडणूक विभाग आरक्षणाबाबत हरकती व सूचना असल्यास जिल्हाधिकारी कार्यालय (ग्रामपंचायत निवडणूक शाखा) व निर्वाचक गणाबाबत हरकती व सूचना असल्यास त्या संबंधित तहसील कार्यालयात दि.29 जुलै 2022 ते 2 ऑगस्ट 2022 (कार्यालयीन वेळेत) या कालावधीत सादर करता येतील.

00000

आयटीआय झालेल्यांचा 8 ऑगस्टला ॲप्रेंटिसशिप भरती मेळावा

 

सोलापूर, दि. 29 (जिमाका): औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सोलापूर येथे आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी 8 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 10 वाजता ॲप्रेंटिसशिप उमेदवारी भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील सर्व कारखानदार व उमेदवारांनी मेळाव्यास उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा. ज्या कारखान्यामध्ये अद्याप शिकाऊ उमेदवारी योजना लागू केलेली नाही, ज्या कारखान्यांना नोकर भरती करावयाची आहे, अशा सर्व कारखाना प्रतिनिधींनी ॲप्रेन्टीस ट्रेनिंग विभागास संपर्क साधावा, असे आवाहन प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सोलापूर यांनी केलेले आहे.

00000

 

 

 

4,5 ऑगस्टला ऑनलाईन रोजगार मेळावा

सोलापूर, दि. 29 (जिमाका): जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सोलापूर यांच्यामार्फत जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांसाठी दि. 4 व 5 ऑगस्ट 2022 रोजी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन केल्याची माहिती कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त सचिन जाधव यांनी दिली.

जिल्ह्यातील नोकरी इच्छुक उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. रोजगार मेळाव्यात ट्रेनी, आयटीआय फिटर, ईलेक्ट्रिशियन, विमा प्रतिनिधी, 10 वी पास, 12 वी, डिप्लोमा, पदवी, बी.एस.सी. केमेस्ट्री / एम.एस.सी. केमेस्ट्री अशा प्रकारची एकूण 180 रिक्तपदे पाच उद्योजकांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अधिसूचीत केलेली आहेत.

नोकरी इच्छुक उमेदवारांनी संकेतस्थळावर नोंदणी पूर्ण करून शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्तपदांसाठी ऑनलाईन अर्ज करावा, जेणेकरून त्यांना मेळाव्यात सहभागी होता येईल. रोजगार मेळाव्यात जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करून सहभागी व्हावे. याबाबत काही अडचण आल्यास कार्यालयाच्या 0217-2950956 या दूरध्वनीवर अथवा प्रत्यक्ष जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नॉर्थ कोट, पार्क चौक, सोलापूर येथे संपर्क साधावा, असे आवाहन श्री. जाधव यांनी केले आहे.

00000

 

जिल्ह्यात मतदारांकडून आधारची माहिती संग्रहित करण्यासाठी ४ सप्टेंबर पासून विशेष मोहीम राबविणार

                                                -जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर

*जिल्ह्यात मतदारांकडून आधार माहिती संग्रहित करण्याचा कार्यक्रम १ऑगस्ट २०२२ ते १   

  एप्रिल २०२३ या कालावधीत सुरू राहणार

*निवडणुक कायदा (सुधारणा) अधिनियम, २०२१ अन्वये लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५०

 मध्ये सुधारणा

*यामधील कलम २३ नुसार मतदार याद्यातील तपशीलाशी जोडण्याकरीता आणि प्रमाणीकरणासाठी मतदारांकडून ऐच्छिकपणे आधारची माहीती संग्रहित करण्याच्या सुधारणेचा समावेश

*या सुधारण्याची अंमलबजावणी १ ऑगस्ट २०२२ पासून होणार

  आधार क्रमांक मिळवण्याचा उद्देश मतदार यादीतील मतदाराच्या नोंदीचे प्रमाणीकरण व   

  भविष्यात अधिक चांगल्या निवडणूक सेवा प्रदान करणे

 

सोलापूर दि. 29 (जिमाका):जिल्ह्यात मतदारांकडून आधारची माहीती संग्रहित करणेचा कार्यक्रम दि ०१ ऑगस्ट, २०२२ ते दि. ०१ एप्रिल, २०२३ या कालावधीत राबविण्यात येणार असून याबाबतचे पहिली विशेष मोहीम दि ०४ सप्टेंबर, २०२२ रोजी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रावर आयोजित करण्यात येणार आहे. तरी याचा लाभ सर्व मतदारांनी घेवून या मोहिमेमध्ये उस्फुर्तपणे सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आवाहन केले आहे.

      तसेच मतदारांच्या सोयीसाठी मतदारांना ऑनलाईन पध्दतीने आधार क्रमांक भरण्यासाठी अर्ज क्र.६ब ERO Net, GARUDA, NVSP, VHA या माध्यमांवर देखील उपलब्ध असेल. अर्ज क्र. ६ ब च्या छापील प्रती देखील संबंधित बीएलओ (BLO) यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच भारत निवडणुक आयोगाने विकसित केलेल्या पोर्टल/अँपच्या माध्यमातुन मतदार ऑनलाईन पध्द्तीने अर्ज क्र.६ब भरून आधार क्रमांक नोंदवू शकतो आणि UIDAI कड़े नमुद असलेल्या मोबाईल क्रमांकावर प्राप्त OTP द्वारे आधार प्रमाणीकरण करु शकतो.  अशी माहिती श्री. शंभरकर यांनी दिली.

    आधार क्रमांक देणे पूर्णपणे ऐच्छिक आहे. मतदार नोंदणी अधिकारी मतदारांना हे स्पष्ट करतील की आधार क्रमांक मिळवण्याचा उद्देश मतदार यादीतील त्याच्या नोंदीचे प्रमाणीकरण करणे आणि भविष्यात त्यांना अधिक चांगली निवडणूक सेवा प्रदान करणे हा आहे.  जर, मतदाराकडे आधार क्रमांक नसेल आणि त्यामुळे त्याचा/तिचा आधार क्रमांक सादर करता येत नसेल, तर मतदाराला नमुना अर्ज क्र. ६ ब मध्ये नमूद केलेल्या अकरा पर्यायी कागदपत्रांपैकी कोणत्याही एक दस्तावेज सादर करावा.

      निवडणुक कायदा (सुधारणा) अधिनियम, २०२१ अन्वये लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० मध्ये सुधारणा केल्या आहेत. यामधील कलम २३ नुसार मतदार याद्यातील तपशीलाशी जोडण्याकरीता आणि प्रमाणीकरणासाठी मतदारांकडून ऐच्छिकपणे आधारची माहीती संग्रहित करणे बाबतच्या सुधारणा अंतर्भुत आहेत. त्या आधारे मतदार नोंदणी नियम १९६० मधील नियम २६B मध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात आलेल्या आहेत.

सदर सुधारणांची अंमलबजावणी दि.०१ ऑगस्ट, २०२२ पासून लागु होणार आहेत.

      उपरोक्त कायदा आणि नियमांमध्ये केलेल्या सुधारणानंतर, मतदार नोंदणी अधिकारी (ERO) हे मतदार यादीत असलेल्या प्रत्येक व्यक्तीकडून विहित स्वरूपात आणि रीतीने आधार क्रमांक मिळविण्यासाठी वैधानिकरित्या प्राधिकृत करण्यात आलेले आहेत. तसेच अधिसुचना दि. १७ जुन २०२२ मध्ये निर्दिष्ट केल्यानुसार दि. ०१ एप्रिल २०२३ पर्यंत किंवा तत्पूर्वी मतदार यादीत असलेली प्रत्येक व्यक्ती याचा आधार क्रमाक उपलब्ध करून देऊ शकतो.

कार्यक्रमाचे उद्दिष्ट

      लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० मधील कलम २३ मधील दुरुस्तीने स्पष्टपणे नमूद केले आहे की विद्यमान मतदारांकडून आधार संकलनाचा उद्देश मतदारांची ओळख प्रस्थापित करणे आणि मतदार यादीतील नोंदीचे प्रमाणीकरण करणे आणि एकापेक्षा जास्त मतदारसंघात किंवा एकापेक्षा जास्त वेळा त्याच मतदारसंघात एकाच व्यक्तीच्या नावाची नोंदणी ओळखणे हा आहे. या कार्यक्रमाचा उद्देश कायदेशीर तरतुदीस अनुसरून आहे. तथापि, आधार क्रमांक सादर करणे हे मतदारांच्या वतीने ऐच्छिक आहे असेही आयोगाने स्पष्ट केलेले आहे.

             आधार संकलनाची कार्यपद्धत

लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० मधील कलम २३ मधील तरतुदीनुसार मतदार यादीतील विद्यमान मतदारांना त्यांच्या आधार क्रमांक भरण्यासाठी मतदार नोंदणी नियम १९६० मधील नियम २६ व मध्ये नमुना अर्ज क्र.६ ब तयार करण्यात आला आहे. अर्ज क्र. ६ ब भारत निवडणुक आयोगाच्या आणि मुख्य निवडणुक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असेल, तसेच मतदारांना ऑनलाईन पद्धतीने आधार क्रमांक भरण्यासाठी अर्ज क. 6 ब  ERO NET, GARUDA, NVSP, VHA या माध्यमांवर देख…

Post a Comment

0 Comments