साखर निर्मितीत आता ग्रीन टेक्नॉलॉजीचा वापर शक्य; विठ्ठल साखर कारखान्याच्या निवृत्त कार्यकारी संचालकांची माहिती

           


साखर निर्मितीत आता ग्रीन टेक्नॉलॉजीचा वापर शक्य; विठ्ठल साखर कारखान्याच्या निवृत्त कार्यकारी संचालकांची माहिती


आयुष्यात साखर (Sugar) खाल्ली नाही, असा माणूस शोधून सापडणार नाही. अनेक देशांचं अर्थकारण याच साखरेवर आहे. मात्र, साखर तयार करण्याच्या प्रोसेसमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषणाची समस्या निर्माण होते. यावर आता चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे. प्रत्येक घरात वापरली जाणारी साखर आता हरित प्रक्रिया (Green Process Technology) तंत्रज्ञानाने तयार केली जाणार आहे. राष्ट्रीय साखर संस्थेच्या तज्ज्ञांनी हे नवीन तंत्रज्ञान विकसित केले आहे. होय, साखर उद्योगात आता हरित प्रक्रिया वापरून साखर बनवली जाणार आहे. पर्यावरण दूषित होण्यापासून वाचणार आहे. दुसरीकडे साखर उत्पादनात वाया जाणारे पाणीही वाचणार आहे.



      साखर ही सगळ्या जगाचे तोंड गोड करते पण त्यावर खूप लोक टीका करताना दिसतात. पण त्यामागील कष्ट कोणालाच दिसत नाहीत. त्यामुळे किती लोकांची उपजीविका चालते या कडे पण कोणी लक्ष देत नाही . उद्या जर हा उद्योग बंद पडला तर यावर अवलंबून असणाऱ्या लोकांची पोटं कशी भरणार? यावर कोण बोलत नाही.

तरीही साखर उदयोगातील तज्ञ मंडळी यावर विचार करीत आहेत. म्हणून  आता पर्यावरण पूर्वक साखर निर्मितीला प्रोत्साहन देणे सुरू झाले आहे.



त्यात पहिले पाऊल कानपूर च्या साखर संस्थेने उचलले आहे .

म्हणजे काय तर आता साखर तयार करताना हरित प्रक्रियेचा वापर होणार आहे. 


त्यामुळे पायरीवरून दूषित होणार नाही,  कारखान्यात वापरले जाणारे पाणी वाचणार आहे . आणि वातावरणात CO2 देखील सोडला जाणार नाही.  तसेच साखर निर्मितीत वापरले जाणारे फॉस्फोरिक एसिड चा खर्च पण वाचणार आहे. त्यामुळे पर्यावरण वाचणार आहे, आणि पर्यावरण प्रेमीचा विरोध आपोआप कमी होईल. पाणी वाचल्यामुळे कारखान्याचा पाण्याचा खर्च वाचेल आणि शिल्लक राहिलेले पाणी शेती साठी किंव्हा उद्योगासाठी वापरता येईल, असा दुहेरी फायदा पण दिसेल. त्यामुळे येत्या काही दिवसात हे शक्य होणार आहे.


सध्या 100 टन ऊस गाळप करणेसाठी 40/45 टन वाफ लागते पण या हरित प्रक्रियेमुळे वाफेची पण बचत होईल. त्यामुळे bagas वाचेल, वाफेत बचत होईल तसेच लाखो लिटर पाणी वाचेल. कारण या प्रक्रियेत पाणी वापर खूप कमी असेल. 

या मुळे पर्यावरण आणि पाणी दोन्ही वाचेल यात शंका नाही.


- अनंत विठ्ठलराव निकम 

(निवृत्त कार्यकारी संचालक, श्रीविठ्ठल सहकारी साखर कारखाना, वेणुनगर, गुरसाळे, ता.पंढरपूर)

Post a Comment

0 Comments