दोन्ही पार्ट्या विठ्ठल कारखाना चालवू शकत नाहीत म्हणुनच आम्ही अभिजीत पाटीलांन सोबत* - सुर्यकांत बागल

 



*दोन्ही पार्ट्या विठ्ठल कारखाना चालवू शकत नाहीत म्हणुनच आम्ही  अभिजीत पाटीलांन सोबत* - सुर्यकांत बागल 


भावनिकतेपेक्षा चोख व्यवहार पार पाडणार्‍याच्या पाठिशी उभारणार सभासद

वारसा हक्कापेक्षाही स्वकर्तृत्व महत्वाचे - अभिजीत पाटील


(गादेगाव येथे निवडणुकीच्या प्रचारार्थ सभासदांनी केली मोठी गर्दी)


प्रतिनिधी/-

दोन्ही पार्ट्या विठ्ठल कारखाना चालवू शकत नाहीत. मागील संचालक मंडळाने कारभार करीत असताना संस्थेचे हित न पाहता जे बेकायदेशीर उद्योग केले आहेत. त्याचा परिणाम  विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या अर्थकारणावर झाला असून यामध्ये सभासद,कामगार, वाहतूक ठेकेदार, व्यापारी, यासह बँकाही अडचणीत आल्या आहेत. त्यामुळे पुढील भविष्यकाळ व्यवस्थीत पार पडावा यासाठी या निवडणूकीच्या निमित्ताने योग्य वेळ आली असून या निवडणुकीत मतदान करीत असताना अभिजीत पाटील यांच्या पाठीशी आम्ही आहोत अशी ग्वाही दिली. कारखाना चालवणारा माणूस व्यवस्थीत चोखपणे सर्व व्यवहार पाळू शकतो अशा पॅनलच्या पाठिशी हा विठ्ठलचा सभासद नक्कि राहणार असल्याची माहिती विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुर्यकांत बागल बोलताना म्हणाले.



तालुक्यातील गादेगाव येथे बुधवारी सायंकाळी आयोजीत करण्यात आलेल्या बैठकीत बोलत होते. पुढे बोलताना श्री विठ्ठल परिवर्तन विकास आघाडीचे अभिजीत पाटील म्हणाले की, मी सभासद असलेल्या या विठ्ठलची आवस्था पाहून आपण या निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मी मागील दोन वर्षांपासून अनेक सभासदांच्या वैयक्तीक गाटी भेटी आणि गावभेटीही केल्या आहेत. यामध्ये सभासदांकडून व्यक्त झालेल्या भावना मी पुर्णपणे समजून घेतल्या आहेत. त्यामुळे त्या सभासदांनी मला जो शब्द दिला आहे. त्यामध्ये माझ्या समोर सभेसाठी काही सभासद येवू शकत नसले तरी मी करीत असलेल्या कारखानदारीतील कारभाराबाबत माझ्यावर पुर्ण विश्‍वास ठेवणार आहेत. त्यामुळे गर्दीपेक्षा मतदान महत्वाचे आहे. याचा अनुभव मतमोजणी झाल्यावर नक्किच दिसून येणार आहे. यामुळे या बंद पडलेल्या कारखान्यास कसे सुरू करता येईल आणि कारखान्याकडील सर्व देणी कशापध्दतीने फेडता येतील या बाबतचा पुर्ण प्लॅन तयार असल्याचेही अभिजीत पाटील यांनी सांगितले.


काहीजण वारसदारांच्या नावाखाली कर्तृत्व दाखविण्यात असमर्थ ठरले आहेत. हे त्यांच्या कारभारावरून दिसून आले आहे. परंतु भावनिकता दाखविण्यासाठी आता पुर्वजांचे वेशभुषा करून समोर येण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु सभासद आता कोणत्याही भावनेला बळी न पडता कर्तृत्वाला साथ देणार हे मात्र नक्की असल्याचे पाटील यांनी सांगितले.



यावेळी विठ्ठलचे संचालक सुर्यकांत बागल यांनीही कारखान्यातील गैरकारभाराबाबत सभासदांसमोर माहिती सांगितली. सध्या वाईट परस्थितीतून चाललेल्या विठ्ठलला फक्त अभिजीत पाटीलच सावरू शकतात. त्यांच्या पाठिशी उभे राहण्याचा निर्णय आम्ही घेतला असून सर्व सभासदांनीही त्याच पध्दतीने मतदान करावे असे आवाहन केले आहे. यावेळी डॉ.बी.पी.रोंगे,  धनाजी पाटील, उपसरपंच गणपत मोरे, विष्णू बागल, तानाजी बागल, दिपक भोसले, सचिन पाटील, गणेश बागल, रणजीत बागल, यांच्यासह सर्व शेतकरी संघटनांचे नेते उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments