पॅनल प्रमुखांच्या अर्धांगिनींचा प्रचार दौरा सुरूच भाळवणीनंतर गाठले करकंब !

  



Pandharpur Live Online:

विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीत रंगत वाढत चालली आहे. तालुकाभर प्रचाराच्या फैरी झडत असतानाच, पॅनल प्रमुखांच्या प्रचारासाठी त्यांच्या अर्धांगिनीही प्रचारात सामील झाल्या आहेत. भाळवणीनंतर आता करकंबमध्ये सुनिता पाटील आणि मधुरा पवार यांनी प्रचार दौरा केला. घरोघर जाऊन सभासदांच्या गाठीभेटीही घेतल्या.



विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. निवडणूक तिरंगी होत असल्याने प्रत्येकच पॅनलने प्रचारासाठी जोर लावला आहे. युवराज पाटील यांच्या श्री विठ्ठल अण्णाभाऊ विकास पॅनलमध्ये युवराज पाटील आणि ॲड. दीपक पवार हेही निवडणूक रिंगणात उतरले आहेत. या पॅनलच्या प्रचारासाठी सौ. सुनीता युवराज पाटील आणि मधुरा दीपक पवार याही उतरल्याचे दिसत आहे. परवाच भाळवणी गावात घरोघर फिरून त्यांनी प्रचार पार पाडला. शुक्रवारी त्यांनी करकंब गावात प्रवेश केला.  



श्री विठ्ठल अण्णाभाऊ विकास पॅनलचे महत्त्व घरोघरी जाऊन महिलांना पटवून दिले. करकंब हे मोठे गांव आहे. या गावात शेतकऱ्यांसह मोठा व्यापारीवर्ग आहे. शेतकरी सभासदांसह, व्यापारी वर्गानेही या महिला टीमचे जोरदार स्वागत केले. घरोघर हळदी कुंकवाचा कार्यक्रमही पार पडला.

Post a Comment

0 Comments