रविवारी विठ्ठल कारखान्याच्या प्रचाराचा शेवट झाला. श्री विठ्ठल आण्णाभाऊ विकास पॅनलने सुरुवातीपासूनच प्रचारात आघाडी घेतली आहे. मतदान होईपर्यंत सभासदांनी आपले मत ठाम ठेवावे, कोणाच्याही आमिषाला बळी पडू नये, सभासदांनी आपल्या पाठीशी उभे राहिल्यास, त्यांच्या विश्वासाला कोणत्याही प्रकारचा तडा जाऊ दिला जाणार नाही, अशी प्रतिक्रिया युवराज पाटील यांनी व्यक्त केली. ते करकंब येथील प्रचार सभेत बोलत होते. यावेळी ॲड. दीपक पवार, गणेश पाटील आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते.
विठ्ठल कारखान्याच्या प्रचाराच्या तोफा आता थांबल्या आहेत. शनिवारी रात्री या पॅनलची प्रचारसभा करकंबमध्ये पार पडली. यावेळी युवराज पाटील यांनी सभासदांना पाठीशी राहण्याचे आवाहन केले.
विठ्ठल कारखाना निवडणुकीत प्रस्थापित चेअरमन भगीरथ भालके आणि , उद्योजक अभिजीत पाटील यांनी आपले पॅनल उतरवले आहेत. या दोन्ही पॅनलवर युवराज पाटील यांनी जोरदार टीका केली.
सभासद बंधूंनी मतदानाला जाण्याअगोदर सदविवेक बुद्धी जागृत ठेवावी, याचवेळी कुटुंबातील सर्वांशी चर्चा करून मतदानाला सामोरे जावे, स्व. औदुंबर अण्णा पाटील यांच्या काळातील विठ्ठल कारखाना साकारण्याचे काम आम्ही मंडळी करणार आहोत. यासाठी सभासदांनी पाठीवर थाप द्यावी, असे आवाहन युवराज पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.
विठ्ठल कारखाना चांगल्या माणसाच्या हातात देऊन, कारखान्याचे गतवैभव पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न विठ्ठलचा सभासद वर्ग करत आहे. विठ्ठलच्या सभासदांसाठी ही शेवटची संधी आहे. सभासदांनी जागृत राहून मतदान करावे, कोणत्याही प्रकारच्या भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन युवराज पाटील यांनी प्रचार सभेत व्यक्त केले.
0 Comments