आदित्य ठाकरेंना वगळून शिवसेनेच्या 53 आमदारांना विधिमंडळ सचिवांनी पाठविली नोटीस III



 मुंबई | राज्यात एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत हात मिळवणी करत सरकार स्थापन केले आहे. विधानसभेत शिंदे सरकारने बहुमत चाचणीत देखील पास झाले आहेत. यावेळी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटातील 53 आमदारांना विधीमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांनी विधानसभा अध्यक्ष निवडणुकीदरम्यान व्हिपचे उल्लंघन केल्याप्रकरणी नोटीस पाठविली आहे.



राज्याच्या इतिहासत पहिल्यांदाच असे घडले असून शिंदे गटांनी माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंना नोटीस पाठविले नाही. 53 आमदारांना आठवड्याभरात उत्तर मागितले आहे.

विधानसभा अध्यक्ष निवडीच्या वेळी शिंदे गट आणि उद्धव गटाच्या आमदारांनी एकमेंकांविरोधात व्हिपचे उल्लंघन केल्याची तक्रार दोन्ही गटांनी राज्य विधिमंडळाच्या सचिवकांडे तक्रार केली होती. सचिवांनी 53 आमदारांना पक्षांतराच्या कारणावरून अपात्रेच्या नियमा अंतर्गत नोटीस पाठविली आहे. यानुसार या सर्व आमदारांना आठवड्याभरात उत्तर देण्याचे आहे.

शिंदे-भाजपला बहुमत चाचणीसाठी 3 – 4 जुलै रोजी विशेष अधिवेशन बोलविले होते. या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी दोन्ही गटाच्या तक्रारी पटलावर घेतले. यानंतर विधानसभा अध्यक्षांची निवड झाल्यानंतर नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी देखील शिंदे गटाच्या गटाच्या व्हिपचे उल्लंघन केल्याचे पटलावर घेतले. या आधारे विधिमंडळाच्या सचिवांनी त्यांना नोटीस पाठविली.

Post a Comment

0 Comments