उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खासगी सचिव म्हणून विद्याधर महाले यांची नियुक्ती
बातमी 24 तास ऑनलाईन: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खासगी सचिव म्हणून बुलडाण्याचे विद्याधर महाले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, महाले हे चिखलीच्या भाजपा आमदार श्वेताताई महाले यांचे पती आहेत.
विद्याधर यांचे वडील दयासागर महाले हे बुलडाणा येथे वृत्तपत्र विक्रेते होते. विद्याधर महाले स्पर्धा परिक्षेतून जिल्हा परिषदेत उपमुख्यकार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त झाले होते. नंतर प्रतिनियुक्तीवर त्यांनी भाजपाचे पांडूरंग फुंडकर, विनोद तावडे व प्रवीण दरेकर या तिन्ही विरोधी पक्ष नेत्यांचे खासगी सचिव म्हणून कार्यभार संभाळला होता. तत्कालीन शिक्षणमंत्री विनोद तावडे व सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे खासगी सचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. विद्याधर महाले यांची उपमुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव म्हणून नियुक्ती झाल्याने चिखली मतदारसंघातील नागरिकांच्या विकास कामांबाबतीत आशा पल्लवित झाल्या आहेत.
0 Comments