श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे सभासदांनी आजवरच्या राजकीय राजकारणात चोख भूमिका बजावली आहे. विठ्ठल परिवाराची निर्मिती ही आपल्या विरोधात असलेल्या पांडुरंग परिवाराच्या विरोधात लढण्यासाठी झाली आहे. परंतु या विठ्ठलच्या निवडणुकीतील विरोधी दोन्हीही पॅनलच्या उमेदवारांनी सध्या विरोधकांना सामावून त्याच्याशी युती केली आहे. यामुळे खरा लढणारा विठ्ठल परिवार हा आमच्याकडे उरला आहे. यामुळे या निवडणुकीतील विजय नक्की असल्याची खात्री अभिजीत पाटील यांनी दिली आहे.
सध्या पंढरपूर तालुक्यातील विठ्ठलची आणि मंगळवेढा भागातील दामाजी साखर कारखान्याची निवडणूक एकाचवेळी सुरू आहे. यामध्ये आपल्या विठ्ठल परिवारातील नेत्यांनी वरील निवडणुकीत कोणाबरोबर नेमकी युती करून या निवडणुका लढविल्या जात आहेत. हे सर्व सभासदांनी ओळखले आहे. यामुळे बाटलेल्या परिवारात नसून पिवर विठ्ठल परिवार आपल्या बाजूला या विठ्ठलच्या निवडणुकीत असल्याने आपोआपच ही निवडणूक आपल्यासाठी सोपी झाली असल्याचे अभिजीत पाटील यांनी सांगितले आहे.
विठ्ठलच्या निवडणूक सभेसाठी रविवारी अखेरचा दिवस होता, यामुळे अभिजीत पाटील यांच्या प्रचार सभाचा समारोप क्रांतिकारी असलेल्या *तावशी* येथे आवर्जून ठेवला होता. त्यामुळे क्रांतिकारक निर्णय घेत सभासद हे भ्रष्ट कारभार करीत आलेल्या विरोधकांना यावेळी मुक्काम पोष्टवर पोहचवतील असेही अभिजीत पाटील यांनी सांगितले.
यावेळी पुढे बोलताना अभिजीत पाटील म्हणाले की, मी माझ्या प्रचारात बंद पडलेला हा कारखाना कसा सुरू करणार, आणि जुने कर्ज कसे फेडणार हे सांगत होतो. एवढेच नाहीतर जिल्ह्यातील चांगला दर देणाऱ्याच्या रांगेतही आपला विठ्ठल कारखाना करून दाखविण्याचे भरीव अस्वासन देत आहे. एवढेच नाही तर कारखान्यातील एकही रुपयांचा खर्च चेअरमन म्हणून माझ्यासाठी खर्च करणार नसल्याचे जाहीर केले आहे. अशा प्रकारची कोणतीही घोषणा विरोधकांनी केलेली. यावरून त्यांना सत्ता कशासाठी हवी आहे. हे सभासदातून ओळखले गेले आहे. त्यामुळे सभासद कारखान्याच्या आणि स्वतःच्या हितासाठी योग्य निवड करतील असे ठणकावून अभिजीत पाटील यांनी सांगितले आहे.
या कारखान्यातील पराभव पक्का आहे मनात खूणगाठ बांधून भालके यांनी जाताजाताही कारखान्यातील असलेले १९लाख रुपये या निवडणुकीचा धामधुमीत आपण सगळे अडकलो असताना याच वेळी उचलले ही बाब सभासदांना चांगलीच खटकली असल्याने याचा फायदा आपणास होऊन विजय निश्चित झाला असल्याचे अभिजीत पाटील यांनी सांगितलं आहे. कारखान्यातील जप्तीची प्रक्रिया आहे. अशा टप्यात असलेल्या या कारखान्यास कर्ज देण्यासाठी कोणतीही बँक तयार होईल की नाही याची जाण सभासद यांना आहे. त्यांच्या कर्तृत्वाने विठ्ठलची वाईट अवस्था झाली आहे. त्यांचा हिशोब चुकता करण्यासाठी ही योग्य वेळ असल्याने सभासद ही संधी सोडणार नसल्याचेही अभिजीत पाटील यांनी सांगितले.
या सभेमध्ये उपस्थित शिवसेनेचे साईनाथभाऊ अभंगराव, या पॅनलचे मार्गदर्शक डॉ रोंगेसर, रयतक्रांती चे दीपक भोसले, तावशीचे बाळासाहेब यादव, प्रा तुकाराम मस्के, स्वाभिमानाचे सचिन पाटील, काॅग्रेसचे नेते नितीन नागणे,यांच्यासह तावशी भागातील अनेकांनी आपले विचार व्यक्त केले.
विट्ठलच्या निवडणुकीत
ओझेवाडी येथील स्व बबनराव नागणे सर यांचा एक गट महत्वपूर्ण मानला जातो, यामध्ये ओझेवाडी आणि लगतच्या गावात चांगले मतदान आहे. यामुळे हा गट कोणत्या पॅनलच्या सोबत राहील याबाबतीत उत्सुकता लागून राहिली होती. परंतु या गटाकडून कारखाना चालवून दाखविणाऱ्या मध्ये अभिजीत पाटील सक्षम आहेत. त्यांच्याकडे पूर्वीचे चार साखर कारखाने असताना आता बीड येथील गजानन साखर कारखाना घेत ५ कारखाने असणाऱ्या अभिजीत पाटील यांना पाठींबा व्यक्त करीत चांगलीच मोर्चेबांधणी आखली आहे.यामध्ये शहाजीबापू नागणे आघाडीवर आहेत.
0 Comments