विरोधकांकडून दिशाभूल होतेय नादी लागून फसू नका .... गणेश पाटील यांचे सभासदांना आवाहन

विठ्ठलचे रणांगण पुरते पेटले आहे. प्रचार कार्याच्या अंतिम टप्प्यात तोफा एकमेकांवर धडाडू लागल्या आहेत. या निवडणूक रिंगणात उतरलेल्या भगीरथ भालके आणि अभिजीत पाटील यांच्यावर सरकोली येथील सभेत, गणेश पाटील यांनी जोरदार प्रहार चढवला. यावेळी युवराज पाटील, ॲड.दीपक पवार यांच्यासह परिसरातील मान्यवर सभासद उपस्थित होते.

पाच जुलै रोजी विठ्ठल कारखान्यासाठी मतदान होत आहे. या निवडणुकीत तिरंगी सामना रंगला आहे. विठ्ठलचे संचालक युवराज पाटील यांच्या पॅनलने प्रचारात आघाडी घेतली आहे. गुरुवारी रात्री सरकोली येथे त्यांची प्रचारसभा पार पडली. या सभेत गणेश पाटील यांनी विरोधकांचा समाचार घेतला.  




विठ्ठलच्या सभासदांसमोर विरोधातील दोन्ही पॅनलचा लेखाजोखा मांडला. भगीरथ भालके यांनीच कारखाना मोडकळीस आणल्याचे सभासदांना ज्ञात आहे. कारखान्यात प्रचंड भ्रष्टाचार झाला आहे. स्व. आ. भारत भालके यांच्या निधनाची सहानुभूती मिळवून, विरोधकांवर लबाडीचे आरोप त्यांच्याकडून होत आहेत. लबाड बोलण्याची सीमा त्यांनी पार केली असल्याचे त्यांनी ठासून सांगितले.

या निवडणुकीतील दुसरे विरोधक अभिजीत पाटील यांनी  'कारखाना चालवणार माणूस' अशी उपाधी स्वतःच लावून घेतली आहे. माझ्याशिवाय कोणीही करताना चालवू शकत नाही, हे दाखवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. खरे तर या दोघांनीही सभासदांच्या परस्पर कारखान्याचा सौदा चालवला होता. सभासदांचे नशीबच बलवत्तर म्हणून सौदा आटोपला नाही, असे सांगून गणेश पाटील यांनी सभासदांना सावध करण्याची भूमिका घेतली. या दोन्हीही लबाड आणि धुर्त मंडळींपासून सावध रहा, आणि कारखाना सभासदांच्या हाती ठेवण्यासाठी, युवराज पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा असे आवाहन केले.



विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीतील दोन्ही विरोधक, लबाडीचे राजकारण करत आहेत. भगीरथ भालके आणि अभिजीत पाटील सभासदांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. सभासदांनी त्यांच्या भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन गणेश पाटील यांनी सभासदांना केले आहे.

Post a Comment

0 Comments