Swiggy Viral Video : स्विगी बॉय व्हायरल ! पावसातला हा फेमस व्हिडीओ पाहिलात का

 


Swiggy Delivery Boy Viral Video : इन्स्टाग्रामवर नुकताच एक व्हिडिओ पोस्ट (Posted On Instagram) करण्यात आला आहे, ज्यामुळे अनेकांना रडू येऊ शकतं.

सोशल मीडियावरील काही व्हिडिओ आपल्याला हसवतात तर काही त्यांना भावनिक देखील बनवतात. हा व्हिडिओ (Trending Video Swiggy) पाहून स्विगीच्या डिलिव्हरी बॉयचं कौतुक करताना लोक थकत नाहीत. आपण अनेकदा असे व्हिडिओ पाहतो, ज्यात डिलिव्हरी बॉयची मेहनत आणि संघर्ष स्पष्टपणे दिसून येतो. अनेक वेळा ते आपल्यापर्यंत ऑर्डर वेळेवर पोहोचवण्यासाठी जीवाची बाजी लावतात. कशाचाच विचार करत नाहीत, पाऊस पाणी वारा, त्याचं फक्त एकच टार्गेट असतं ऑर्डर (Order Delivers On Time) आपल्या पर्यंत पोहचवणं. असाच काहीसा प्रकार या छोट्या व्हिडिओमध्येही पाहायला मिळतोय.

भिजलेला डिलिव्हरी बॉय

या व्हिडीओमध्ये सर्व गाड्या ट्रॅफिक सिग्नलवर थांबताना दिसत आहेत. व्हिडिओच्या फोकसमध्ये स्विगीचा एक डिलिव्हरी बॉय आहे. रेनकोट न घालता तो बाइकवर बसून पावसात भिजत आहे. हे संपूर्ण प्रकरण जाणून घेण्याआधी तुम्हीही हा व्हायरल व्हिडिओ अवश्य पाहा…

लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हा व्हिडिओ पाहून कमेंट सेक्शनमध्ये अनेक जण प्रतिक्रिया देतायत. अर्थात असा व्हिडीओ पाहताना लोकं स्वतःला थांबवू शकले नाही. बरीच लोकं भावुक झाली आहेत. एका युझरने सांगितलं की, त्याचं आयुष्य किती कठीण आहे, त्यामुळे ब्रेड कमावणं खरंच खूप कठीण काम आहे. काही युझर्सनी अशा डिलिव्हरी बॉयला सॅल्यूट केला, तर काहींनी याला रेनकोट गिफ्ट करा असं म्हटलं.

व्हिडिओ झाला व्हायरल

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ अनेकदा पाहिला गेला आहे. इतकंच नाही तर दहा लाखांहून अधिक लोकांना (सोशल मीडिया यूजर्स) आवडला आहे. अनेक युजर्स या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसून आले.



Post a Comment

0 Comments