एस के एन सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, कोर्टी, पंढरपूर येथे कॅस्पर फौंडशन, रोटरी क्लब व पालवी संस्था पंढरपूर यांच्या संयुक्त उपक्रमातून *ससटेनेबल कॅम्पस ड्राईव्ह* चे आयोजन करण्यात आले होते.
पंढरपूर सिंहगड कॅम्पसमध्ये करण्यात आले. या ड्राईव्ह अंतर्गत *"वेस्ट टू वेल्थ - हॅन्डमेड पेपर"* निर्मिती प्रक्रियेचे छोटे प्रात्यक्षिक व स्थापत्य अभियांत्रिकि विभागातील विद्यार्थ्यांनी *रिसायकल्ड वेस्ट प्लॅस्टिकपासून पेविंग ब्लॉक* तयार केलेल्या प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी *प्लास्टिक मुक्त कॅम्पस* अभियानाअंतर्गत विद्यार्थ्यांनी कॉलेज परिसरातील प्लास्टिक कचरा गोळा केला भविष्यात याचा वापर विधायक प्रकल्पात केला जाईल. आंतरराष्ट्रीय प्लास्टिक बॅग फ्री डे चे औचित्य साधून पंढरपूर सिंहगड महाविद्यालय, रोटरी क्लब व पालवी संस्था, कॅस्पर फौंडशन यांच्या संयुक्त विद्यमानाने "ससटेनेबल कॅम्पस ड्राईव्ह संपन्न झाला.
यामध्ये पालवी संस्थेतील मंगलताई शहा, कॅस्परचे आयुशी मॅडम, सैनी मॅडम रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. कैलाश करांडे, विश्वंभरजी पाटील, सचिव श्री भिंगे, सोमाणी, कपडेकर, शहा सोमेश गानमोटे याशिवाय पंढरपुर सिंहगड कॉलेजचे उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, डाॅ. बाळासाहेब गंधारे, डाॅ. संपत देशमुख, प्रा. गणेश लकडे आदी मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिंहगड काॅलेज व रोटरी क्लब यांनी परिश्रम घेतले.
0 Comments