विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने भगीरथ भालके यांनी, युवराज पाटील यांना पाच वर्षासाठी चेअरमन करण्याची तयारी दर्शवली होती. ही तयारी ज्या दिवशी दाखवली, त्याच दिवशी भगीरथ भालके हे पराजित झाले आहेत. साखर कारखाना चालवण्यात आम्हीही तितकेच माहीर आहोत. सभासदांनी आपले मत अण्णाभाऊ विकास पॅनललाच देऊन सहकार्य करावे, आम्ही आपला विश्वास सार्थ ठरवू , असे मत गणेश पाटील यांनी व्यक्त केले. ते करकंब येथील प्रचार सभेत बोलत होते. यावेळी युवराज पाटील, ॲड. दीपक पवार यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
विठ्ठल कारखान्याच्या प्रचाराचा रविवारी शेवटचा दिवस आहे. श्री विठ्ठल अण्णाभाऊ विकास पॅनलने सुरुवातीपासूनच प्रचारात आघाडी घेतली आहे. शनिवारी सायंकाळी करकंब येथे प्रचारसभा पार पडली. या सभेस सभासदांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी गणेश पाटील यांनी सभासदांना विश्वास देत, पाठीशी राहण्याचे आवाहन केले.
कारखान्याच्या निवडणुकीत दोन विरोधक उतरले आहेत. एका विरोधकाने विठ्ठल कारखाना रसातळाला नेऊन ठेवला आहे. याची सभासदांना ही माहिती आहे. तर दुसरा विरोधक कारखाना चालवणारा माणूस अशी उपाधी लावून सभासदांपुढे जात आहे. आम्हालाही कारखाना चालवण्याचा अनुभव आहे. या दोघांनीही कारखान्याचा सौदा करण्याचे ठरवले होते , याची दखल सभासदांनी घ्यावी. स्व. औदुंबर अण्णा पाटील यांच्या काळातील साखर कारखाना साकारण्यासाठी, युवराज पाटील यांच्या पाठीशी सभासदांनी खंबीरपणे उभे राहावे, असे मत गणेश पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.
0 Comments