त्यानिमित्त रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पंढरपूर येथे तहसीलदार अभिजित पाटील यांना सन्मानचिन्ह व प्रशस्त पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
पंढरपूर आषाढी एकादशीनिमित्त श्री. विठ्ठल- रुक्मिणी च्या महापूजेसाठी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे पंढरपूर येथे आले असता, 'माझे कार्यालय सुंदर कार्यालय' या स्पर्धेतील पुरस्काराचा वितरण समारंभ संपन्न झाला. यावेळी आम. तानाजीराव सावंत, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, सोलापुर ग्रामीण पोलिस अधीक्षक तेजस्विनी सातपुते आदी उपस्थित होते. माझे कार्यालय सुंदर कार्यालय अभियानांतर्गत सांगोला तालुक्यातील सर्व रास्त भाव धान्य दुकानानंतर मंडलअधिकारी कार्यालय व तलाठी कार्यालय सुसज्ज, सुंदर व दप्तर 6 बंडल आद्यवत अर्थात आयएसओ मानांकन करण्यासाठी मा. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने तहसीलदार अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न केले होते.
तालुक्यात एकूण 70 तलाठी व मंडलाधिकारी कार्यालय सुसज्ज, सुंदर व दप्तर 6 बंडल आद्यवत अर्थात आयएसओ मानांकन प्राप्त करण्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन लोकसभागाच्या माध्यमातून प्रयत्न केला होता. लाकडी टेबल,लाकडी खुर्ची, लोखंडी मोठे कपाट, लोखंडी रॅक, सूचना पेटी, डस्ट बिन लहान व मोठी, प्लास्टिक ऑफिस खुर्ची, सर्व नेम प्लेट व कार्यालयाचे बोर्ड, पोर्टेबल टॉयलेट, कलर आदी कामे करण्यात आली होती. तालुक्यातील प्रत्येक गावांमध्ये तलाठी कार्यालय सुसज्ज व सुंदर बनवण्यासाठी त्या त्या गावातील दानशूर मंडळींनी तसेच सर्वच नागरिकांनी सहभाग नोंदविला. त्यामुळे तालुक्यातील तलाठी कार्यालय सुंदर व सुसज्ज झाली होती. यावर मा. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी भेट देऊन पाहणी केली होती. यांच्यासह जिल्हास्तरीय पथकाने देखील पाहणी करून कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले होते.
'माझे कार्यालय, सुंदर कार्यालय' या जिल्हास्तरीय स्पर्धेचा निकाल झाला. यामध्ये सांगोला तालुक्याला दुसरा क्रमांक मिळाला. या यशाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सन्मान चिन्ह व प्रशस्त पत्र देऊन गौरविण्यात आले. तहसीलदार अभिजित पाटील यांच्या पुढाकाराने सांगोला तालुक्याला 'माझे कार्यालय, सुंदर कार्यालय' या स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळाल्याबद्दल त्यांचे तालुक्यातील सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
0 Comments