○ पोलीस मिञ, अन्न व औषध प्रशासनाचे स्वयंसेवक म्हणून पाहिले काम
पंढरपूर: प्रतिनिधी
आषाढी वारी निमित्त लाखों भाविक पंढरपूर मध्ये आले असताना या वारक-यांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून हाॅटेल, हातगाडे खाद्यपदार्थ विक्री करणा-या मध्ये भेसळ असण्याची शक्यता असते. यामुळे वारक-यांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. याच अनुषंगाने कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग मधील जवळपास १०० हून अधिक विद्यार्थ्यांनी अन्न व औषध प्रशासनाकडून देण्यात आलेल्या नियमानुसार स्वयंसेवक म्हणून काम पाहिले असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
यामध्ये सिंहगड कॉलेज मधील विद्यार्थ्यांनी पंढरपूर परिसरातील हाॅटेल मध्ये जाऊन त्यांच्याकडेच अन्न व औषध प्रशासनाची परवानगी आहे का? हे पाहिले, जे पदार्थ विक्रीसाठी ठेवले आहेत ते योग्य आहेत का?, स्वच्छता यासह अनेक गोष्टींची सिंहगडच्या विद्यार्थ्यांकडून पाहणी करण्यात आली. याशिवाय राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थी पोलीस मिञ म्हणून पोलीस प्रशासनाकडून देण्यात आलेली माहिती वारक-यांना पोहचविण्यात महत्त्वपूर्ण कामगिरी करत होते.
दरम्यान वारक-यांची गर्दी पाहता त्यांचे आरोग्य धोक्यात येऊ नये म्हणून सिंहगड कॉलेज मधील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांकडून ५ जुलै ते १० जुलै या कालावधीत जनजागृतीपर मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये समन्वयक म्हणून प्रा. चंद्रकांत देशमुख, प्रा. अजित करांडे, प्रा. सुमित इंगोले, प्रा. अर्जुन मासाळ, प्रा. सिद्धेश्वर गौणगोडा, विद्यार्थी प्रतिनिधी नागेंद्रकुमार नायकुडे, सिंहगड कॉलेज च्या शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांसह राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
0 Comments