मराठी बातमी 24 तास :
राज्य मंत्रिमंडळाचा काल विस्तार करण्यात आला. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी 18 नवनियुक्त मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. राजभवनातील दरबार हॉल येथे शपथविधी समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
या समारंभास विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार, राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, प्रधान सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनिषा म्हैसकर उपस्थित होते.
शपथविधी सोहळ्यास सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास प्रारंभ झाला. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी सर्वश्री राधाकृष्ण विखे-पाटील, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, डॉ.विजयकुमार गावित, गिरीष महाजन, गुलाबराव पाटील, दादाजी भुसे, संजय राठोड, सुरेश खाडे, संदीपान भुमरे, उदय सामंत, प्रा.तानाजी सावंत, रवींद्र चव्हाण, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, अतुल सावे, शंभूराज देसाई, मंगलप्रभात लोढा यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.
राष्ट्रगीताने शपथविधी सोहळ्याची सुरुवात आणि सांगता झाली. या सोहळ्याला नवनियुक्त मंत्र्यांचे कुटुंबीय, लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी आदी उपस्थित होते.
कोणत्या मंत्र्याकडे कोणतं खातं?
- एकनाथ शिंदे – मुख्यमंत्री, नगरविकास
- देवेंद्र फडणवीस – उपमुख्यमंत्री, गृह, अर्थ
- राधाकृष्ण विखे पाटील – महसूल
- चंद्रकांत पाटील – सार्वजनिक बांधकाम
- सुधीर मुनगंटीवार – ऊर्जा, वन
- मंगलप्रभात लोढा – विधी व न्याय
- रविंद्र चव्हाण – गृहनिर्माण
- उदय सामंत – उद्योग
- दीपक केसरकर – पर्यावरण, पर्यटन
- सुरेश खाडे – सामाजिक न्याय
- दादा भुसे – कृषी
- गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा
- गिरीश महाजन – जलसंपदा
- विजयकुमार गावित – आदिवासी विकास
- अब्दुल सत्तार – अल्पसंख्याक विकास
- अतुल सावे – आरोग्य
- तानाजी सावंत – उच्च व तंत्रशिक्षण
- संजय राठोड – ग्रामविकास
- शंभुराज देसाई – उत्पादन शुल्क
- संदीपान भुमरे – रोजगार हमी
मुख्यमंत्रीपद शिंदेंकडे, पण महत्वाची खाती भाजपकडेभाजपनं मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांच्याकडे दिल्यानंतर राजकीय वर्तुळात आणि सर्वसामान्य नागरिकांकडूनही आश्चर्य व्यक्त करण्यात आलं होतं. मात्र, मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे असले तरी महत्वाची खाती मात्र भाजपनं आपल्याकडे ठेवल्याचं पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह आणि अर्थ ही महत्वाची खाती असणार आहेत. तर महसूल खातं भाजपचेच राधाकृष्ण विखे पाटील सांभाळणार आहेत. ऊर्जा खात्याची जबाबजदारी सुधीर मुनगंटीवारांकडे देण्यात आली. तर सार्वजनिक बांधकाम खातं चंद्रकांत पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलंय.
नवनियुक्त मंत्री महोदयांचा संक्षिप्त परिचय
0 Comments