मराठी बातमी 24 तास Online : मुंबईतील पत्राचाळ घोटाळा प्रकरणी (Patra Chawl Land Scam Case) ईडीच्या कोठडीत (ED Custody) असलेल्या शिवसेना खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांना आज पुढील सुनावणीसाठी कोर्टात हजर करण्यात आले.
पत्राचाळ प्रकरणात ईडीच्या कोठडीत असलेल्या शिवसेना खासदार संजय राऊत यांची ईडी कोठडी (ED Custody) संपल्यानंतर आज त्यांना कोर्टात हजर करण्यात आले. तिथे ईडीनं त्यांच्या कोठडीची मागणी केली नाही, त्यामुळे त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. राऊतांची रवानगी आता आर्थर रोड कारागृहात होणार आहे. आर्थर रोड कारागृहात संजय राऊत यांना घरचं जेवण आणि औषधं पुरवण्याची मुभा न्यायालयानं दिली आहे. पत्राचाळ कथित घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांना 31 जुलैच्या मध्यरात्री अटक (Arrest) झाली. त्यानंतर गेले आठ दिवस ईडीच्या कोठडीत त्यांची चौकशी सुरु होती. दरम्यानच्या काळात त्यांच्या पत्नी वर्षा राऊत (Varsha Raut) यांनाही पत्राचाळ आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात (Money Laundering Case) ईडीने समन्स बजावले होते. त्यांची देखील चौकशी करण्यात आली.
| Mumbai: Shiv Sena MP Sanjay Raut sent to judicial custody till 22nd August in connection with Patra Chawl land case
— ANI (@ANI)
दरम्यान, ईडीच्या कोठडीत असताना सुद्धा संजय राऊत यांच्या नावाने शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या
दैनिक सामनामधून लेख छापून आला. या लेखाची ईडी चौकशी करणार आहे.
मागील आठ दिवसांपासून संजय राऊत हे ईडीच्या कोठडीत आहेत.
त्यामुळे कोठडीत असताना रविवारच्या सामनाच्या अंकात रोखठोक सदर कुणी लिहिला याची चर्चा रंगली आहे.
आता ईडीने सुद्धा या रोखठोक सदराची दखल घेतली आहे.
0 Comments