राष्ट्रपती मूर्मू यांचे स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला स्वातंत्र्य सैनिकांना नमन

 


नवी दिल्ली : नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी रविवारी 76 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशात आणि परदेशात राहणाऱ्या सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

राष्ट्रपतींनी 1947 मध्ये झालेल्या फाळणीत ज्यांनी आपले प्राण गमावले त्यांनाही श्रद्धांजली वाहिली. उल्लेखनीय म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्याच वर्षी 14 ऑगस्ट हा फाळणी स्मरण दिन घोषीत केला होता.

राष्ट्रपती मूर्मू म्हणाल्या की, देशात आणि परदेशात राहणाऱ्या सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. या महत्त्वपूर्ण प्रसंगी तुम्हाला संबोधित करताना मला आनंद होत आहे. भारत स्वतंत्र राष्ट्र म्हणून ७५ वर्षे पूर्ण करत आहे. सामाजिक सलोखा, ऐक्य आणि लोकांचे सक्षमीकरण वाढवण्याच्या पार्श्वभूमीवर १४ ऑगस्ट हा दिवस 'भयावह फाळणी स्मरण दिन ' म्हणून पाळला जातो.

Post a Comment

0 Comments