नांदेड : नांदेड (Nanded) जिल्ह्यातून एक भयंकर घटना समोर आली आहे. विडी ओढून झाल्यावर ती घरातील फेकणं तीन जणांच्या जीवावर बेतलं आहे.
पेटलेली बिडी घरात ठेवलेल्या फवारणी पंपावर पडली आणि भीषण स्फोट (Accident) झाला. यामध्ये एकाच कुटुंबातील तीन जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. देगलूर तालुक्यातील बल्लूर या गावात ही भयंकर घटना घडली आहे. (Nanded Latest News)
Buldhana News : बुलडाण्यात स्वाईन फ्लूचा शिरकाव; इकबाल चौकातील युवक पॉझिटिव्ह
सूर्यकांत माधवराव सक्रप्पा (वय ५२ वर्षे), गुबाई सूर्यकांत सक्रप्पा (वय ५० वर्षे) आणि मुलगा कपिल सूर्यकांत सक्रप्पा (वय २० वर्षे) अशी मृत्युमुखी पडलेल्या तिघांची नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार, सूर्यकांत सक्रप्पा हे आपल्या पत्नी आणि मुलासह बल्लूर गावात वास्तव्यास होते. तर शेतीची कामे सुरु असल्याने पिकांवर फवारणी करण्यासाठी त्यांनी फवारणी टॅंक आणली होती. त्यासाठी त्यात पेट्रोल सुद्धा भरून ठेवले होते.
दरम्यान, ७ ऑगस्ट रोजी सूर्यकांत सक्रप्पा हे आपल्या पत्नी आणि मुलासह नेहमीप्रमाणे गप्पा मारत घरात बसले होते. गप्पा मारता-मारता त्यांनी विडी पेटवली. पेटवलेली विडी ओढून झाल्यानंतर त्यांनी घरातील कोपऱ्यात फेकण्याचा प्रयत्न केला. मात्र ती घरात ठेवलेल्या फवारणी पंपावर पडली. (Nanded Todays News)
Maharashtra Politics : विधानपरिषदेत शिंदे गटाला मोठा धक्का; कामकाज समितीत ठाकरे गटाचा समावेश
टॅंकमध्ये पेट्रोल असल्याने जोराचा भडका झाला. पाहता-पाहता मोठा स्फोट झाला आणि सूर्यकांत यांच्यासह पत्नी गुबाई आणि मुलगा कपिल यांच्यावर आगीचा भडका जाऊन पडला. यामध्ये तिघेही गंभीर भाजले गेले. देगलूरच्या रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना विष्णुपुरी नांदेड येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरु असतांना अखेर तिघांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
0 Comments