रोटरी क्लब कडून आरोग्यविषयक मार्गदर्शन व साहित्य वाटप

 


रोटरी क्लब पंढरपूर यांच्याकडून  शुक्रवार दिनांक १२ ऑगस्ट २०२२ रोजी कोर्टी (ता.पंढरपूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक मार्गदर्शन व टूथपेस्ट वाटत तर १३ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळी वस्ती येथे आरोग्य तपासणी केली असल्याची माहिती रोटरी क्लब चे अध्यक्ष डाॅ. कैलाश करांडे यांनी दिली.

    दि. १२ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोर्टी (ता.पंढरपूर) येथील शाळेतील विद्यार्थ्यांना डाॅ. उषा अवधूतराव यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक माहिती देऊन दैनंदिन जीवनातील सवयी आरोग्यास किती महत्वाच्या आहेत याबद्दल  महत्वपूर्ण मार्गदर्शन केले. तर १३ ऑगस्ट रोजी माळी वस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत डाॅ. योगेश जोशी, डाॅ. विनय भोपटकर, डाॅ. दिपक आचलारे, डाॅ. अरूण मेनकुदळे, डाॅ. मिलिंद लोटके, डाॅ. डी. पी. धोञे, डाॅ. विरेंद्र व्होरा आदींनी डेंटल हेल्थ तपासणी केली

   यानंतर उपस्थित विद्यार्थ्यांना रोटरी क्लब कडून मोफत टूथपेस्ट वाटत करण्यात आली.

    या कार्यक्रमासाठी पांडूरंग सहकारी साखर कारखान्याचे संचालक भैरू माळी, रो. डाॅ. उषा अवधूतराव, रो. तेजस पिल्ले, रो. विनोद भाटिया, रो. किशोर सोमाणी, रो. महेश निर्मळे, रो. भुषण शहा, रों किशोर निकते, रो.अजिंक्य पांढरे, रो. विश्वास आराध्ये, रो. अभय गुंडेवार, रो. अँड सुरेश जोशी, रो. अमिर भायाणी, रो. अमरिष गोयल, रो. आनंद गोसावी, रो. अंकुश कौलवार, रो अशुतोष खंकाळ, रो. डॉ भोपटकर, राजेंद्र केसकर, रो. श्रीकांत देशपांडे, रो. किशोर सोनाणी, रो. श्रीरंग बागल, रो. भुषण शहा, रो. जयंत हरिदास, रो. कल्पक कोठाडीया, रो. महेश निर्मळे, रो. मकरंद रत्नपारखी आदींसह प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षका उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments