सोलापूर, दि.7(जिमाका):- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षाच्या निमित्ताने क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा परिषद आणि सोलापूर महानगरपालिका यांच्या यांच्या संयुक्त विद्यमाने नेहरूनगर येथील शासकीय मैदानावर भव्य शालेय स्तरावरील फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन महापालिकेचे उपायुक्त मच्छिंद्र घोलप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर तर प्रमुख उपस्थिती जिल्हा संघटक स्काऊट श्रीधर मोरे, जिल्हा नियोजन अधिकारी प्रसाद घाडगे, सहाय्यक संशोधन अधिकारी विशाल मडके, तालुका क्रीडा अधिकारी सत्तेन जाधव व अन्य मान्यवर उपस्थित होते.
ही फुटबॉल स्पर्धा पाच दिवस चालणार असून यामध्ये सोलापूर महानगरपालिका शहर हद्दीतील शाळेतील उर्दू मराठी इंग्रजी कन्नड इत्यादी सर्व शाळांचे सहावी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे 14 वर्षाखालील मुले व 17 वर्षाखालील मुले तसेच 17 वर्षाखालील मुली यांची सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल चषक स्पर्धा घेण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांची स्पर्धा सध्या चालू असून यामध्ये एकूण 19 शाळेचे संघ सहभाग झाले आहेत, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी श्री तारळकर यांनी दिली. या कार्यक्रमाची प्रास्तावना महापालिकेचे क्रीडा अधिकारी नजीर शेख यांनी केली.
0 Comments