पंढरपूर (दि.07):- शहरातील घरघुतीसह सार्वजनिक मंडळाच्या मुर्ती गोळा करण्यासाठी पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने शहरात 13 ठिकाणी मुर्ती संकलन केंद्राची उभारणी केली आहे. तसेच निर्माल्य गोळा करण्यासाठी फिरत्या वाहनांची व संकलन केंद्रावर व्यवस्था करण्यात आली आहे. आपत्ती व्यवस्थापनतंर्गत चंद्रभागा नदीपात्रात बोटीची व जीवरक्षकांची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी दिली.
गणेश विसर्जनासाठी नगरपालिका प्रशासनाच्या वतीने तयारी पुर्ण केली असून, विसर्जन ठिकाणी पुरेसा प्रकाश व्यवस्था, आवश्यक ठिकाणी बॅरेकेटींग करण्यात आले आहे. नदीपात्रात होडीतून विसर्जन करताना क्षमतेपेक्षा जास्त व्यक्तींनी बसू नये. विसर्जनाच्या वेळी लहान मुलांना नदीपात्रापासून दूर ठेवावे. पावसामुळे घाटावरील पायऱ्या निसरड्या होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी दक्षता घेवून सुरक्षित विसर्जन करावे असे आवाहनही मुख्याधिकारी माळी यांनी केले आहे.
विसर्जनासाठी गणेशमुर्ती याठिकाणी जमा कराव्यात
अर्बन बँक प्रशासकीय इमारतीसमोर, भोसले चौक गणेश मंदिरासमोर, शेटे पेट्रोलपंपा समोर, कॉलेज चौक बस स्टॉप जवळ, ठाकरे चौक, सावरकर चौक गजानन मेडिकल समोर, शिवतीर्थ शिवाजी चौक, महात्मा फुले पुतळ्यासमोर, महाद्वार चौक पोलीस चौकी जवळ, मुक्ताबाई मठा समोर, अंबाबाई पटांगण समोर विठ्ठल मोबाईल शॉपी जवळ, यमाई तलाव गेट जवळ टाकळी रोड, तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग जवळ या ठिकाणी घरघुतीसह सार्वजनिक मंडळाच्या मुर्ती गोळा करण्यासाठी संकलन केंद्र उभारण्यात आले आहेत.
0 Comments