Marathi batmi 24 taas online team: - प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या विविध शिष्यवृत्ती व इतर काही लाभाच्या योजनेपोटी मिळणाऱ्या नाममात्र अनुदानाच्या रकमेवर बँकेकडून बँक चार्जेस व जीएसटी आकारले जात असल्याचे समोर आले आहे.
कोरोनाकाळात विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार देता आला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना खात्यावर रोख स्वरुपात अनुदान देण्यात आले. कटोल तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वलनी डफ्फर येथील २८ विद्यार्थ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा करण्यात आली. या विद्यार्थ्यांच्या खात्याचा तपशील मुख्याध्यापक शेषराव टाकळखेडे यांनी मागवला असता, त्यांच्या खात्यातून एसएमएस चार्जेस तीन महिन्याला १५ रुपये व जीएसटी तीन महिन्याला २.७० रुपये अशी रक्कम आकारण्यात आल्याचे दिसून आले आहे.
असे झाले उघड
२०१९मध्ये एका विद्यार्थ्याने ५०० रुपये भरुन खाते उघडले होते. नंतर त्याने ते ५०० रुपये काढून घेतले आणि २०२२ पर्यंत त्याने कोणताही व्यवहार त्या खात्यातून केला नाही. जुलै २०२२मध्ये त्याच्या खात्यावर शालेय पोषण आहाराचे २१० रुपये जमा झाले. पण बँकेने त्याच्या खात्यातून एसएमएस चार्ज म्हणून १४५ व जीएसटीचे २५ रुपये कपात केली.
मुख्याध्यापक परसराम गोंडाने म्हणाले की, १ ते ५च्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराचे २१० रुपये जमा केले होते. त्यातून जीएसटी २.१० रुपये व ६ ते ८च्या विद्यार्थ्यांच्या खात्यात ३१५ रुपये जमा केले होते. त्यांच्या खात्यातून ३.१५ रुपये जमा करण्यात आली. अनुदानाची रक्कम मुख्याध्यापकांच्या खात्यावर जमा होते. ही रक्कम त्यांना विद्यार्थ्यांच्या खात्यावर आरटीजीएस करावे लागते. यासाठीही बँकिंग चार्जेस आणि जीएसटी भरावे लागत आहे.
(सोर्स: इंडिया दर्पण)
0 Comments