डोंबिवली: घरगुती वादातून मामाने भाच्याची चाकूचे वार करून हत्या केल्याची खळबळजनक घटना रविवारी रात्री १०.३० वाजता पुर्वेकडील देसलेपाडा परिसरातील विनायक कुंडल बिल्डींगमध्ये घडली.
आरोपी सतिश हा बहिण सरीताकडेच वास्तव्याला असून रविवारी रात्री सरीताचे वडील आणि तीचे पती यांच्याशी सतिशचा वाद झाला. सतिशने वडीलांना आणि तीच्या पतीला शिवीगाळ केली. त्यावेळी घरात असलेला सरिताचा यश याने मामा सतिशला समजवण्याचा प्रयत्न केला. याचा राग सतिशला आला. त्याने घरातील किचनमधील धारदार चाकू घेतला आणि रागाच्या भरात यश याच्यावर सपासप वार केले. यात छातीच्या डाव्या बाजुला गंभीर दुखापत होऊन त्यात यशचा मृत्यू झाला. दिवाळीच्या पुर्वसंध्येला ही घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून नेमका घरगुती वाद कशावरून झाला याबाबतचे कारण समजू शकलेले नाही.
0 Comments