लग्न हा प्रत्येकासाठी खास दिवस असतो. या दिवसाची वाट प्रत्येकजण पाहत असतो. काहीजण आधी प्रेमात पडतात आणि त्याच जोडीदारासोबत लग्न करतात. मात्र, काहीजणांचे हे नाते लग्नाआधीच तुटते.
हा व्हिडिओ यूट्यूबवर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की ती मुलगी वधूचा पोशाख घालून बसली आहे आणि तिला तिच्या एक्स बॉयफ़्रेंडसाठी गाणं म्हणायच आहे. जेव्हा तिला तिच्या एक्स बॉयफ़्रेंडचे नाव विचारले जाते तेव्हा ती म्हणते, “मी एक्सचे नाव घेऊ शकत नाही, तो बदनाम होईल.” यानंतर मुलीला विचारले जाते की ती कोणते गाणे गाणार आहे, त्यावर ती म्हणते, “जिती थि जिसके लिये”. यानंतर मुलगी माईक घेऊन गाणे म्हणू लागते आणि जवळ उभा असलेला नवरा तिच्याकडे बघतच राहतो.
0 Comments