लातूर : शेतजमिनीच्या भांडणाच्या कारणावरून लाठ्याकाठ्या आणि कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण करून गंभीर जखमी केले.
पाेलिसांनी सांगितले, फिर्यादी मुरलीधर बापूराव देवकते (वय ५३, रा. लाेदगा, ता. औसा) यांना औसा पाेलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. भुसणी गावातीलच दत्ता वैजनाथ देवकते याच्यासह अन्य ९ जणांनी संगनमत करून, शेतजमिनीच्या भांडणाच्या कारणावरून, काठ्या, कुऱ्हाडीच्या दांड्याने फिर्यादीसह अन्य एकाला हातावर, अंगावर जबर मारून जखमी केले. शिवाय, शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना भुसणी शिवारात १५ ऑक्टाेबर राेजी घडली.
याबाबत औसा पाेलीस ठाण्यात दहा जणांविराेधात साेमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पाेलीस निरीक्षक डाेंगरे करत आहेत.
0 Comments