शेतात काम करत असताना वीज पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

 


घनसावंगी तालुक्यात पाऊस सुरू  असताना सरफगव्हाण येथे शुक्रवारी (दि.१४) सकाळी ११ वाजेच्या सुमारास वीज कोसळल्याने तुकाराम बाळाभाऊ काळे (वय ४३) या शेतकऱ्याचा मृत्यू झाला.

घटनेच्या वेळी मयत हे शेतात काम करीत होते. अचानक वीज कोसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. यामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. राज्यात परतीच्या पावसाला सुरूवात झाली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात 3-4 दिवसांसाठी गडगडाटी वादळाचा इशारा देण्यात आला होता. भारतीय हवामानशास्त्र विभागाने मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणातील काही भागांसाठी पुढील तीन ते चार दिवस यलो अलर्ट जारी केला



Post a Comment

0 Comments