दोघा चोरट्यांनी पायी जात असताना तरुणाला अडवून गांजा विकतो का असे बोलून त्याच्या खिशातील मोबाईल व रोकड जबरदस्तीने चोरुन नेण्याचा प्रकार समोर आला आहे.याप्रकरणी दिनेश भागवत पवार (वय ३२, रा. केळगाव, आळंदी - यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. २७८/२२) दिली आहे. पोलिसांनी राहुल बाबु रिटे (वय २५, रा. पाटील इस्टेट, शिवाजीनगर याला अटक केली आहे. हा प्रकार पाटील इस्टेट पुलाखाली शनिवारी मध्यरात्री पाऊण वाजता घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचा आतेभाऊ हे पाटील इस्टेट पुलाखालून पायी जात असताना तेथे दुचाकीवर दोघे जण थांबले होते. त्यांच्यापैकी एकाने फिर्यादीला अडवून तू गांजा विकतो का असे बोलून शर्टच्या वरच्या खिशात हात घालून मोबाईल फोन व रोख रक्कम असा २० हजार ३०० रुपयांचा माल जबरदस्ती चोरला व ते दोघे दुचाकीवर बसून निघून गेले.
खडकी पोलिसांनी राहुल रिटे याला अटक केली असून त्याच्या साथीदाराचा शोध घेत आहेत.
0 Comments