याप्रकरणी अधिक माहिती अशी की, दिघी परिसरातील राहणारा हा तरुण प्रेयसी सोबत सिंहगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या गोळेवाडी येथील एका लॉजवर गेला होता. तीन वर्षापासून या दोघांचे प्रेम संबंध होते. दरम्यान प्रेयसीचे लग्न जमले असल्यामुळे तो तणावात होता. या लॉजवर गेले असतानाही त्यांच्यात वाद झाला. प्रेयसी त्याला समजवत असतानाच त्याने तुझे दुसऱ्याशी लग्न जमले आहे. मी कसा जगू असं म्हणत तिच्याच ओढणीनेच गळफास लावून घेतला आणि आत्महत्या केली.
दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यानंतर हवेली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला. हवेली पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.
0 Comments