पोलिसांची गाडी अडवली म्हणून एका पठ्ठ्याने चक्क रस्त्यावर झोपून आंदोलन केले

 


पुणे: पुणे तिथे काय उणे असं नेहमीच म्हटलं जातं. याची प्रचिती ही वेळोवेळी आपल्याला पाहायला मिळते आज पुण्यातील अलका चौक येथे अशीच काहीशी परिस्थिती पाहायला मिळाली आहे. सध्या सर्वत्र दिवाळीची तयारी सुरू असल्याने पुणे शहरातील सर्वच रस्त्यांवर वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे तसेच ट्रॅफिक पोलिसांकडून चौका चौकात चौकशी देखील केली जात आहे तसेच एका चौकशीचा फटका पुण्यातील एका युवकाला बसला आणि त्या पठ्ठ्याने चक्क रस्त्यावर झोपून आंदोलन सुरू केल

पुण्यात एमपीएससी ची तयारी करणारा एक युवक दिवाळीनिमित्ताने घरी म्हणजेच गावाला जात असताना तो आणि त्याच्या मित्र दुचाकी वर जात होते त्याच वेळेस ट्राफिक पोलिसांकडून त्या युवकाला अडवण्यात आलं आणि त्यावेळेस त्या युवकाकडून पोलिसांना विनंती करण्यात आली की माझी आता ट्रेन आहे मला जाऊद्या मी ऑनलाईन चलन भरेल पण ट्राफिक पोलिसांनी या युवकाला जाऊन दिल्याने त्या युवकांची ट्रेन मीस झाल्याने त्या युवकाने चक्क रस्त्यावरच झोपून आंदोलन सुरू केलं . नंतर त्या पोलिसांनी त्या तरुणाला पोलीस स्टेशनवर सोडले. हा प्रकार सोशल मीडियावर वायरल होत आहे.




Post a Comment

0 Comments