महिलेवर बलात्कार करुन तिच्याकडून पाच लाखांची खंडणी घेतल्या प्रकरणी एका व्यावसायिकाच्या विरोधात खडक पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
संजय कुंदनलाल परमार (वय ५७, रा. एकबोटे काॅलनी, अंजली अपार्टमेंट, घोरपडे पेठ) असे गु्न्हा दाखल केलेल्या व्याव्यवसायिकाचे नाव आहे.
पीडित महिला आणि आरोपी परमार ओळखीचे आहेत. परमार यांनी महिलेला जाळ्यात ओढून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर ध्वनिचित्रफीत प्रसारित करण्याची धमकी देऊन महिलेकडून पाच लाख रुपयांची खंडणी घेतली. महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक घाडगे तपास करत आहेत.
0 Comments