गोंदिया : रावणवाडी पोलीस ठाण्यांत कार्यरत पोलीस शिपायाच्या भावाला बॅटरी चोरी केल्याच्या संशयावरून बेदम मारहाण करण्यात आली.
मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. ही घटना १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४.४० वाजता रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या आंबेडकर चौक कुडवा येथे घडली. भुमेंद्र लिलाधर मेश्राम (३२) रा. कुडवा असे मृताचे नाव आहे.
रावणवाडी पोलीस ढाण्यात कार्यरत पोलीस शिपाई नरेंद्र लिलाधर मेश्राम (३६) यांनी रामनगर पोलीसात दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचा लहान भाऊ भुमेंद्र लिलाधर मेश्राम (३२) रा. कुडवा हा १५-२० दिवसापासून मनिष मिताराम बघेले (३४) रा. कुडवा याच्याकडे वायफाय केबल कनेक्शनचे काम मजुरीने करीत होता. बॅटरी चोरीचा संशय घेत आरोपी मनिष बघेले व भावीन पारधी रा. कुडवा यांनी सायंकाळी ४.४० वाजता आंबेडकर चौक कुडवा येथे लाथाबुक्यांनी, थापडांनी, ढकलत ढकलत मारपीट केली. यात भुमेंद्र लिलाधर मेश्राम (३२) चा मृत्यू झाला आहे. या घटनेसंदर्भात रामनगर पोलिसांनी भादंविच्या कलम ३०२, ३६४, ३४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद कुरसुरी करीत आहेत. आरोपी मनिष बघेले व भावीन पारधी याच्या सोबत जबरदस्तीने भुमेंद्रला आपल्या बोलेरो एमएच ३५ पी ४०९८ मध्ये बसवून बियर शॉपीच्या दुकानात घेवून गेला. त्याला तेथेही मारहाण केली.
0 Comments