देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानीअसतात. डिझायनर साड्या, लेहेंगे आणि दागिन्यांचे खास कलेक्शन नीता अंबानीकडे आहे.
नीता अंबानी त्यांच्या फॅशन सेन्ससाठी ओळखल्या जातात. कोणताही कार्यक्रम असो सर्वांच्या नजरा या नीता अंबानीकडे असतात. लग्नामध्ये आणि पार्ट्यामध्ये अनेकदा नीता अंबानीला साडीमध्ये बघितले गेले आहे. नीता यांचे अनेक साडीतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल देखील होतात.
नीता अंबानी यांच्या डिझायनर साड्याच फक्त करोडो रूपयांच्या नसून साडी घालून देण्यासाठी देखील नीता अंबानी खूप मोठी रक्कम मोजतात. डॉली जैन नीता अंबानीला साडी घालून देण्यासाठी मोठी फी घेते. फक्त नीता अंबानीच नाही तर बाॅलिवूडमधील अनेक अभिनेत्री या डॉली जैनकडूनच साड्या घालून घेतात.
एक अशी चर्चा आहे की, नीता अंबानी फक्त डॉली जैनकडूनच साडी घालून घेतात. विशेष म्हणजे नीता अंबानी स्वत: कधीच साडी घालत नसून दरवेळी डॉली जैनच त्यांना साडी नेसून देते. एका वेळी साडी घालण्यासाठी नीता अंबानीकडून डॉली जैन बक्कळ फी घेत असून हा फीचा आकडा ऐकल्यावर नक्कीच तुमचे डोळे विस्फारतील.
अशी एक चर्चा आहे की, एका वेळी साडी घालून देण्यासाठी नीता अंबानी डॉली जैनला तब्बल 15 ते 20 लाख रूपये देतात. मात्र, याबद्दल अजून पूर्णपणे स्पष्टता नाहीये. पण हे नक्की की, साडी घालण्यासाठी नीता अंबानी मोठी रक्कम मोजतात.
0 Comments