रस्त्यावर लाखोंचा अवैध पानमसाला वाहनासह हस्तगत

 


मुक्ताईनगर-बऱ्हाणपुर रस्त्यावर लोखोंचा अवैध पानमसाला हस्तगत करण्यात आला. ही कारवाई आयजीच्या पथकांनी २३ रोजी मध्यरात्री १२ च्या सुमारास केली.

सविस्तर असे की, पोलीस महानिरीक्षक यांचे पथक मुक्ताईनगर तालुक्यात गस्त घालत असताना, पथकास मिळालेल्या गुप्त माहीतीच्या आधारे मध्य प्रदेशातुन अवैध प्रकारे लाखोचा पानमसाला वाहतुक केला जात असल्याचे कळाले. मुक्ताईनगर-बऱ्हाणपुर रस्त्यावर असलेल्या राज्य सीमा तपासणी नाक्याजवळ गस्ती पथकाने सापळा रचुन २३ रोजी मध्यरात्री १२ च्या सुमारास बोरेलो पिक अप वाहन क्रमांक एम एच १९ बी एम ५४०० बंदी असलेला सुमारे १७ लाखाचा पानमसाल्यास सुगंधित तंबाखू वाहतुक करतांना आढळुन आले. पोलीसांनी अवैध मालासह वाहन असा एकुण २१ लाख रुपयाचा माल ताब्यात घेत कारवाई केली. दरम्यान, वाहनचालक चेतन सुभाष झांबरे, वय ३२,रा.कोथळी व सह आरोपी विनायक मनोहर चांदेलकर वय १९, रा.बोदवड तसेच हा माल मुक्ताईनगर येथील अनुपम गोसावी यांचा असल्याच्या निष्पन्न झाल्यावरुन या तिघांविरोधात मुक्ताईनगर पोलीसांत गुन्हा दाखल झाला आहे.

दरम्यान, कर्करोगास कारणीभुत ठरणाऱ्या पानमसाल्यासह सुगंधित तंबाखू या गुटख्यासारख्या उत्पादनावर राज्य शासनाकडुन राज्यात बंदी असतांनादेखिल खुलेआम राजरोसपणे विक्री केली जाते.जवळच असलेल्या मध्य प्रदेशातुन अवैधपणे मालाची आयात केली जात असुन राज्यसीमा ओलांडतांना जबाबदार अधिकारी यांना दिसत नसेल का? तसेच शहरासह ग्रामीण भागात होत असलेली अवैध विक्रीवर का कारवाई केली जात नाही? असे सामान्य पण गंभीर प्रश्न सुज्ञ नागरीकांत उपस्थित होत आहे. राज्य शासनाने गुटख्यासह शरीरास हानिकारक असलेल्या पानमसाला व सुगंधित तंबाखू आदी उत्पादनावर साठा,वाहतुक व विक्रीवर बंदी घातली असुन स्थानिक पातळीवरील अशा प्रकारच्या उत्पादन विक्रीवर कारवाई करण्याचे अधिकार केवळ पोलिसांनाच नव्हे तर ग्रामसेवक,तलाठी यांना सुद्धा असुन ग्राम पातळीवर पोलीस पाटील,सरपंच,ग्राम पंचायत सदस्य यांनीसुद्धा ग्रामस्थांच्या आरोग्याचे हित लक्षात घेऊन तंबाखू जन्य पदार्थांच्या विक्रींना विरोध केला पाहीजेत.

Post a Comment

0 Comments