दोन दुचाकीची समोरासमोर धडक, एकाचा मृत्यू


रोहित आसाराम शिनगारे असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा मित्र विष्णू दशरथ राठोड (वय 23, रा. चाकण) यांनी महाळुंगे पोलीस चौकीत फिर्याद दिली आहे. त्यानुसार एमएच 50/बी 8511 क्रमांकाच्या दुचाकीस्वाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा  मित्र रोहित बुधवारी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास महाळुंगे येथून चाकणकडे दुचाकीवरून जात होता. त्यावेळी समोरून भरधाव वेगात आलेल्या दुचाकीने रोहित यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. यात गंभीर जखमी झाल्याने रोहित यांचा मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर आरोपी दुचाकीस्वार घटनास्थळावरून दुचाकी सोडून पळून गेला. महाळुंगे पोलीस तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments