जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. यामुळे वित्तहानीसह जीवितहानी मोठ्या प्रमाणावर झाली आहे. या दरम्यान बुलढाणा तालुक्यातील रुईखेड मायंबा येथे वीज कोसळून ५७ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
देवराव देवबा सोनुने असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. देवराव सोनुने हे गुरे चारण्यासाठी शेतात गेले होते. संध्याकाळी ६ पर्यंत ते घरी परतले नाहीत. तेव्हा त्यांच्या कुटुंबियांनी शोध घेतला असता शेतातील एक झाडाखाली त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांच्या शेजारी एक गायसुद्धा मृतावस्थेत आढळून आली.
0 Comments