परदेशी महिलेला प्रपोज करण्यासाठी भन्नाट स्टंटआणि मग...

 


पल्याला आवडणाऱ्या व्यक्तीला प्रपोज करणे हा एक मोठा टास्क असतो. मग कधी तिच्याशी मैत्री करुन किंवा आणखी काही युक्त्या वापरुन मुलं किंवा अगदी मुलीही एकमेकांना प्रपोज करताना दिसतात.

खूप तयारी करुन प्रपोज केल्यानंतर ही मुलगी आपल्याला हो म्हटली तर ठिक नाहीतर पुन्हा आयुष्यभर तिच्यासाठी झुरावं लागतं. पण प्रपोज करण्यासाठी कोण काय डोकं लढवेल सांगू शकत नाही. एकमेकांना इंप्रेस करण्यासाठी आपण त्या व्यक्तीसमोर वेगवेगळ्या गोष्टी करतो. ज्यामुळे नकळत ती व्यक्ती आपल्या प्रेमात पडेल आणि आपण एकमेकांसोबत आयुष्य काढू शकू. आता हे झाले आपल्या ओळखीच्या किंवा मित्रमैत्रीणींपैकी कोणाविषयी 

पण एका अनोळखी तेही परदेशी तरुणीला प्रपोज करण्यासाठी एका भारतीय तरुणाने काय शक्कल लढवली हे पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. आता हा व्हिडिओ खऱ्या घटनेचा आहे की तो एडीट करुन तयार केला आहे याबाबत मात्र साशंकता आहे. मात्र व्हिडिओमध्ये लाल किल्ल्याच्या परीसरातून एक परदेशी मुलगी चालत येताना दिसते. तिला इंप्रेस करण्यासाठी आणि प्रपोज करण्यासाठी एक भारतीय तरुण असा काही स्टंट करतो की ते पाहून ही मुलगी आणि आजुबाजूचे सगळेच एकदम चक्रावून जातात.


Post a Comment

0 Comments