राजकीय नेत्यांकडे सर्वसामान्य माणसं आशा, अपेक्षेने पाहतात. आपल्याला न्याय मिळवून देण्यात, योग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यात राजकीय नेते यशस्वी होतील, अशी आशा बाळगली जाते.
राजकीय नेत्यांचं काम जातपात, धर्माच्या सर्व भींती ओलांडून सामाजिक कार्यात सर्वश्रेष्ठ ठरावं, अशी सर्वसामान्यांची इच्छा असते. राजकीय नेते ज्या कुटुंबातून येतात त्या कुटुंबाची देखील जबाबदारी वाढते. आपल्या वागणुकीने नेत्याची प्रतिमा मलीन होणार नाही, याची जबाबदारी खरंतर प्रत्येक नेत्याच्या कुटुंबावर असते. जवळपास सर्वच कुटुंबांकडून याबाबत काळजी घेतली जाते. पण काही ठिकाणी या गोष्टी अपवादात्मक असतात. उत्तर प्रदेशच्या उन्नाव येथे घडलेली एक संतापजनक घटना याच गोष्टीचं ताजं उदाहरण आहे. एका भाजप नेत्याच्या भावांनी एका दाम्पत्याला प्रचंड अमानुषपणे मारहाण केल्याचं उघड झालं आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
0 Comments