जिल्ह्यात गळीत हंगाम काही भागात सुरू झाला आहे. मात्र, सुरुवातीलाच तोडणी मजुरांची टंचाई जाणवत आहे. लाखों रुपये उचल घेऊन मजूर, मुकादम पसार झाले आहेत.
जिल्ह्यात प्रामुख्याने बीड, उस्मानाबाद, सोलापूर या जिल्ह्यातून मजूर येतात. मार्च-एप्रिलमध्ये हंगाम संपल्यानंतर पुढील हंगामासाठी जाताना एका मजुरास 80 ते 90 हजार म्हणजेच टोळीला सुमारे 20 ते 25 लाख रुपयांची उचल टोळीमालक देतात. त्यानंतर अधूनमधून घर खर्च, लग्न, दवाखाना अशा अनेक कारणांसाठी पैसे दिले जातात.
गळीत हंगाम सुरू होण्याच्या आधी काही दिवस वाहतूकदार आणि कारखानदारांमध्ये ऊस वाहतुकीचा करार होतो. करारानंतर तीन लाख रुपये मजुरांना देण्यासाठी आणि दोन लाख रुपये वाहनांच्या देखभालीसाठी असे 5 लाख रुपये कारखान्यांकडून टोळीमालकांना देण्यात येतात.
जिल्ह्यात 17 पैकी 15 साखर कारखाने सुरू आहेत. प्रत्येक वर्षी कारकान्यांकडे 450 ते 500 मजूर टोळ्यांचे करार होतात. दरवर्षी जिल्ह्यात सुमारे 6 ते 7 हजार टोळ्यांचे करार केले जातात. एका टोळीत 10 ते 15 मजूर असतात. मजुरांच्या टोळी प्रमुखास मुकादम म्हणतात. या मुकादमार्फत मजुरांना पैसे दिले जातात. यातून त्याला कमिशन मिळते. जिल्ह्यात वाहतूक संघटनेकडे सुमारे 1 हजार 700 ट्रक आणि ट्रॅक्टरची नोंद आहे. तसेच नोंदणी नसलेल्या वाहनांची संख्याही मोठी आहे.
0 Comments