मुंबई : मुंबईत गुप्तचर महसूल संचलानालय किंवा डीआरआय जोनल युनिट तर्फे 86.5 किलो उच्च दर्जाचा गांजा जप्त करण्यात आला आहे . मुंबई विमानतळावर एयर कार्गो कम्प्लेक्स येथे डीआरआयच्या पथकाने कारवाई करत गांजा जप्त केला आहे.
अमेरिकेतून कुरियरच्या माध्यमातून 86 किलो गांजाच्या दोन खेपा येणार असल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली होती. त्याप्रमाणे डीआरआय अधिकाऱयांनी कारवाई करत मुद्देमाल जप्त केला. अमेरिकेतून आलेली सदर गांजाची खेप भिवंडी साठी पाठविण्यात येणार होती. या प्रकरणात तपासा दरम्यान दोन आरोपीना मुंबईतून अटक करण्यात आली असून प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
0 Comments