वादातून वडिलाने मुलावर चाकूने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना तालुक्यातील उमरवाडा येथे घडली. याप्रकरणी तुमसर पोलिसांनी मुलाला अटक केली आहे.
परमानंद सखाराम मेश्राम (60) असे आरोपीचे नाव असून, भोजराम परमानंद मेश्राम (43) रा. उमरवाडा असे जखमी मुलाचे नाव आहे.
परमानंद मेश्राम आणि मुलगा भोजराम मेश्राम एकाच घरात राहतात. त्यांच्यात घराचा वाद सुरू आहे. बुधवारी दुपारी 2 वाजताच्या सुमारास परमानंदने आपल्या सुनेला 'तुम्ही माझ्या मालकीच्या घरात राहता व मला छपरीत रहावे लागते. घर खाली करा' असे म्हणून शिवीगाळ केली. यावेळी भोजरामने शिवीगाळ कशाला करता असे वडिलाला हटकले असता परमानंदने स्वयंपाक घरातून चाकू आणून भोजरामच्या छातीवर वार केला. जखमी अवस्थेत त्याला तुमसर रुग्णालयात दाखल करण्यात आले.
0 Comments