मला सण्यास घ्यायचाय, तू घटस्फोट दे म्हणत पत्नीचा छळ

 


मला सन्यास घ्यायचा आहे, तू लवकर घटस्फोट दे असे म्हणत पत्नीला वारंवार मानसिक त्रास देत, क्लिनिक टाकण्यासाठी माहेरून पैसे आण म्हणत मारहाण केल्याप्रकरणी पतीसह चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत स्मिता सदानंद मोरे ( वय ३२, रा. चंदन नगर, जुळे सोलापूर ) यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी स्मिता यांचे आरोपी सदानंद मोरे यांच्याशी २०१४ मध्ये विवाह झाला होता. तेव्हापासून आरोपी पती सदानंद याने फिर्यादीला कला क्लिनिक टाकायचे आहे, घेतलेल्या घराचे कर्ज फेडण्यासाठी वारंवार वडिलांकडून पैसे आण म्हणून त्रास देत होते. शिवाय किरकोळ कारणावरून संशय घेऊन हाताने व लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच शारीरिक व मानसिक त्रास दिले. शिवाय लग्नात व विविध कार्यक्रमानिमित्त घेतलेले २७ तोळे सोने फिर्यादीस न देता त्यांना माहेर आणून सोडले. तर आरोपी सासरे भारत गणपत मोरे ( दोघे रा. जिनी अपार्टमेंट, पुणे) यांनी पैशाच्या कारणावरून टोमणे मारत शिवीगाळ करत मारहाण केली तर नणंद स्वाती संजय पाटील हिने घरातील कामाच्या कारणावरून टोमणे देत सदानंद यास उचकवून मानसिक व शारीरिक त्रास दिले, अशा आशयाची फिर्याद स्मिता मोरे यांनी दिली आहे. या फिर्यादीवरून वरील तिघांसह दत्तात्रय मोरे ( रा. मंगळवार पेठ, बार्शी) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास पोलीस करत आहेत.


Post a Comment

0 Comments