घरफोडी लाखोंचा ऐवज लंपास झाल्याने खळबळ

 


    वडगाव मावळ : घराचे कुलूप तोडून घरातून लाखों रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला आहे ही चोरी वडगाव येथील ढोरेवाडा या भागात सोमवार (दि १०):रोजी सायंकाळी ६:३० ते मंगळवार (दि ११) रोजी ६:३० वाजण्याच्या दरम्यान झाली.याच दरम्यान वडगावात अन्य दोन ठिकाणी घरफोडी झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

    शैलेंद्र रामचंद्र ढोरे (वय ५१ रा.ढोरेवाडा वडगाव मावळ) यांनी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

    पोलीस निरीक्षक विलास भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी शैलेंद्र ढोरे हे तळमजल्यावर राहत असून त्यांचे भाऊ नगरसेवक राहुल हे वरच्या मजल्यावर राहिला आहेत सोमवार (दि १० सायंकाळच्या दरम्यान ढोरे यांच्या बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला व घरातील दोन तोळ्याचे सोन्याचे गंठणसह दोन अंगठ्या कानातील झुमके कानातील टॉप रिंगा राजकोट टॉप असा सुमारे १ लाख ९७ हजार रुपये चोरून नेला आहे.

    याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक विलास भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षका शिला खोत करत आहेत.

Post a Comment

0 Comments