ठाण्यात रिक्षाचालकाकडून तरुणीचा विनयभंग, तरुणीला रिक्षातून 20 मीटर फरपटत नेले.. रिक्षाचालक गजाआड!

 

ठाणे : ठाण्यात एका रिक्षाचालकाने कॉलेजच्या विद्यार्थिनीचा विनयभंग केला आहे. इतकेच नाही जेव्हा तरुणीने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला तेव्हा रिक्षावाल्याने या तरुणीला रिक्षातून 20 मीटर फरपटत नेले.

मिळालेल्या माहितीनुसार ठाणे स्थानक परिसरात सकाळी सातच्या सुमारास एक 22 वर्षाची तरुणी कॉलेजला जात होती. सकाळची वेळ असल्याने रस्त्यावर फारशी रहदारी नव्हती. तेव्हा एका रिक्षावाल्याने तरुणीला हाक मारली आणि तिची छेड काढली. तेव्हा तरुणी मागे फिरली आणि त्याला जाब विचारायला आली. तेव्हा रिक्षावाला पळण्याचा प्रयत्न करत होता. या तरुणीने रिक्षावाल्याची कॉलर धरली. तेव्हा रिक्षावाल्याने तिचा हात धरला आणि रिक्षात ओढू लागला. नंतर रिक्षावाला रिक्षात बसून पळ काढत असताना तरुणीला त्याला धरून ठेवले, रिक्षावाल्याने तशाच अवस्थेत रिक्षा सुरू केली आणि तरुणीला 20 मीटर फरपटत नेले. त्यानंतर मुलगी खाली कोसळली आणि आरोपी रिक्षावाला तिथून पळून गेला.

    या घटनेनंतर ठाणे पोलीस या मुजोर रिक्षाचालकाचा शोध घेत होते. अखेर या रिक्षाचालकाला दिघा येथून अटक करण्यात आली आहे.



    आरोपी रिक्षाचालकाने पोलिसांना दिलेल्या जबाबात दारुच्या नशेत त्याने हे कृत्य केल्याची कबुली दिली आहे. शुक्रवारी सकाळी ७ वाजता एक शाळकरी मुलगी ठाणे बाजारपेठेतून पायी जात असताना रिश्रा चालकानं तिच्याकडे पाहून अश्लील हावबाव केले. मुलीनं त्याला जाब विचारल्यानंतर रिक्षाचालकानं तिचा हात पकडून फरफटत नेलं. पोलीस त्याचा शोध घेत होते. अखेर दिघा भागात राहणाऱ्या या रिक्षाचालकाला पोलिसांनी अटक केली आहे.

Post a Comment

0 Comments