अहमदनगर: अहमदनगर शहरातील आशा टॉकीज परिसरातील अरीशा कलेक्शन या दुकानातून पोलिसांनी तलवारी, गुप्ती आणि चाकू अशी 21 हत्यारे जप्त केले आहेत. शहरातील आशा टॉकीज चौकात अरीशा कलेक्शन या दुकानात तलवारी विकत असल्याची माहिती कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांना मिळली होती. त्यानुसार पोलीस स्टेशनचे पीएसआय कचरे पोलीस कर्मचारी योगेश भिंगारदिवे, योगेश खामकर, संदीप थोरात, इनामदार,सुजय हिवाळे, अमोल गाडे, महिला पोलीस कर्मचारी इनामी बागवान यांच्या पथकाने संबंधित दुकानावर जाऊन छापा टाकला असता या ठिकाणी तलवारी, गुप्ती, तसेच चाकू आढळून आले आहेत.
0 Comments