एका रसगुल्ल्यामुळे लग्नाच्या आनंदात दु:खाचं विरजन पडलं आहे. लग्नाच्या वऱ्हाडासोबत आलेल्या २० वर्षीय मुलाचा चाकू लागल्याने मृत्यू झाला. तर १२ जण जखमी झाले आहेत. घटनेनंतर वऱ्हाड लग्नाशिवाय माघारी परतलं.
बुधवारी ही घटना घडली. खंडौली येथे राहणारे व्यापारी वकार यांची दोन मुले जावेद आणि रशीद यांचा विवाह एतमादपूर येथे राहणार्या उस्मानच्या मुली जैनब आणि साजिया यांच्याशी होणार होता.
वऱ्हाडी मंडळींना जेवण दिले जात होते. एका पाहुण्याने रसगुल्ला आवडल्यामुळे आणखी एक खाण्यासाठी मागितला. त्यावर काउंटरवर उभ्या असलेल्या तरुणाने प्रत्येकाला एक-एक मिळेल असं सांगितल्याने वाद झाला. या वादाचे रुपांतर रक्तरंजित चकमकीत झाले. दोन्ही बाजूची मंडळी एकमेकांना भिडली. खुर्ची, चाकू, ताट, चमचा, काटा, हातात जे काही मिळेल त्याला शस्त्र बनवलं. या हाणामारीत २० वर्षीय सनीचा चाकू लागल्याने मृत्यू झाला.
0 Comments